मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार म्हणजेच मोहम्मद युसुफ खान आजही करोडो लोकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी आपल्या कामातून आणि चित्रपटांद्वारे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. दिलीपकुमार यांचे चित्रपट लोकांच्या मनात अजूनही आहेत. आजकाल ते बॉलिवूडपासून दूर आहेत, परंतु सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ किंवा ट्वीट शेअर करुन ते अनेकदा आपल्या चाहत्यांशी संपर्कात असतात. नुकतेच दिलीप कुमार यांनी एक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी त्यांचा आवडीचा गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलेला दिसत आहे. या फोटोत दिलीपकुमार यांच्या पत्नी सायरा बानोही दिसत आहेत.
-
Pink. Favorite shirt. God’s mercy upon all of us. pic.twitter.com/04HyuDFfAB
— Dilip Kumar (@TheDilipKumar) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pink. Favorite shirt. God’s mercy upon all of us. pic.twitter.com/04HyuDFfAB
— Dilip Kumar (@TheDilipKumar) September 30, 2020Pink. Favorite shirt. God’s mercy upon all of us. pic.twitter.com/04HyuDFfAB
— Dilip Kumar (@TheDilipKumar) September 30, 2020
दिलीप कुमार यांच्या या छायाचित्रात ते आणि सायरा बानो एकाच रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. या अभिनेत्याच्या फोटोबद्दल सोशल मीडिया युजर्सनीही बऱ्याच कॉमेंट्स केल्या आहेत. हा फोटो शेअर करताना दिलीप कुमार यांनी सुंदर कॅप्शनही लिहिली आहे.
फोटोत सायरा बानो पती दिलीपकुमारचा हात धरलेल्या दिसत आहेत. याशिवाय दिलीपकुमार यांनी पाकिस्तानात आपल्या हवेलीची काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. प्रांतीय सरकारने त्यांचे व राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
-
Thank you for sharing this. Requesting all in #Peshawar to share photos of my ancestral house (if you’ve clicked the pic) and tag #DilipKumar https://t.co/bB4Xp4IrUB
— Dilip Kumar (@TheDilipKumar) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you for sharing this. Requesting all in #Peshawar to share photos of my ancestral house (if you’ve clicked the pic) and tag #DilipKumar https://t.co/bB4Xp4IrUB
— Dilip Kumar (@TheDilipKumar) September 30, 2020Thank you for sharing this. Requesting all in #Peshawar to share photos of my ancestral house (if you’ve clicked the pic) and tag #DilipKumar https://t.co/bB4Xp4IrUB
— Dilip Kumar (@TheDilipKumar) September 30, 2020
दिलीप कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील कामांसाठी चांगलेच ओळखले जातात. त्यांना 'ट्रॅजेडी किंग' आणि 'द फर्स्ट खान' म्हणून देखील ओळखले जाते. दिलीप कुमार यांनी १९४४ मध्ये 'ज्वार भाटा' चित्रपटातून पदार्पण केले होते. 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 65 चित्रपटांत काम केले. त्यांच्या नावावर 'अंदाज', 'बाबुल', 'दीदार', 'ऐन', 'दाग', 'देवदास', 'आझाद', 'नया दौर', 'मधुमती', 'कोहिनूर' आणि ''मुगल-ए-आजम' असे गाजलेले चित्रपट आहेत.