ETV Bharat / sitara

दिल बेचारा ट्रेलर: सुशांतसिंग राजपूतच्या ह्रदयस्पर्शी संवादाने भारावले चाहते

सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. आपल्या आवडत्या नायकाला शेवटचे पडद्यावर पाहायला लागतंय या कल्पनेनेच अनेक चाहत्यांचे डोळे पाणावले. सोशल मीडियावर भरभरुन पोस्ट लिहिल्या गेल्या आहेत. या चित्रपटातील संवाद चाहत्यांच्या ह्रदयात खोलवर रुतले आहेत.

Dil Bechara trailer
दिल बेचारा ट्रेलर
author img

By

Published : Jul 7, 2020, 3:07 PM IST

नवी दिल्लीः बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा ‘दिल बेचरा’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज झाला. हा ट्रेलर पाहताना अनेक चाहत्यांचे डोळे पाणावले. यातील संवादांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

जॉन ग्रीनच्या प्रसिद्ध प्रसिद्ध 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. अत्यंत ह्रदयस्पर्शी प्रेम आणि आयुष्याची सुंदर वर्णन असलेले संवाद या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. संपूर्ण आयुष्यात जगण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला देणारा संदेश प्रेक्षकांच्या मनाला चटका लाणारा आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

"जन्म कब लेना है और मरना कब है हम निर्णय नहीं कर सकते, पर कैसा जीना है वो हम हम डिसाईड कर सकते है", असा एक डायलॉग ट्रेलरच्या मध्यात पाहायला मिळतो.

अनेक सोशल मीडिया युजर्सनी या डायलॉगच्या उपयोग करीत पोस्ट लिहिल्या आहेत.

हेही वाचा - सुशांतचा 'दिल बेचरा' सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरावा : विद्युत जामवाल

ट्रेलरमध्ये दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची एक आनंदी कॉलेजची विद्यार्थी म्हणून ओळख करुन देण्यात आली आहे. त्याची सहकलाकार संजना सांघीची व्यक्तिरेखा कर्करोगाशी झुंज देणारी आणि एक लाजाळू मुलगी म्हणून दाखवली आहे.

ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसते. आतापर्यंत २६ दशलक्ष व्यूव्ह्ज ट्रेलरला मिळाले आहेत.

मुकेश छाबरा दिग्दर्शित आणि फॉक्स स्टार स्टुडियोजद्वारे बनलेला हा चित्रपट २४ जुलै रोजी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ए.आर. रहमान यांच्या संगीतासह या चित्रपटात सैफ अली खानदेखील एका खास भूमिकेत दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.