मुंबई - बॉलिवूडचे 'ही मॅन' म्हणून ओळखले जाणाऱ्या धर्मेंद्र यांचे आजही प्रचंड संख्येने चाहते आहेत. धर्मेंद्र सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात आणि फोटो व व्हिडिओ पोस्ट करीत असतात.
अलीकडेच धर्मेंद्र यांनी आपल्या फार्महाऊसचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, त्यांनी स्वतः पिकवलेले गहू आणि मोहरीची शेत दाखवले आहे. आता त्याने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो खूप आवडला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
धर्मेंद्र यांनी व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धर्मेंद 'ऐसी जगह ले चल जहां कोई ना हो' हे आवडीचे गीत गुणगुणताना दिसत आहेत. हे गाणे १९५०मध्ये आलेल्या 'आरजु' चित्रपटातील आहे. या चित्रपटात दिलीप कुमार आणि कामिनी कौशल मुख्य भूमिकेत होते.
हे गाणे तलत मेहमूद यांनी गायले असून मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले आहे. धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला कॅप्शन दिलंय, ''कोरोना व्हायरसच्या भीतीने गात नाही .. अट अशी आहे ... तलतच्या गोड आवाजात दिलीप साहेबांवर चित्रित झालेले आरजु चित्रपटातील हे माझे आवडते गाणे आहे.''
या व्हिडिओवर त्यांची मुलगी ईशा देओलची कमेंट आली असून तिने हृदयाची इमोजी दिली आहे. त्याचबरोबर त्यांचे चाहते जोरदार कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की 'तुम्ही अजूनही तितकेच देखणे दिसत आहात', तर एकाने 'क्या बात सर जी' लिहिले आहे, तर एकाने लिहिले आहे 'एखाद्याने आयुष्य कसे जगावे ते तुमच्याकडून शिकले पाहिजे'.
धर्मेंद्र लवकरच मुले आणि नातवंडांसह 'अपने 2' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात देओल कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट २०२१ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या हृदयावर झाली शस्त्रक्रिया!