मुंबई - पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. अशात आता या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
अनेक बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येत तू देश मेरा असं शीर्षक असलेल्या या गाण्यात योगदान दिल्याने सीआरपीएफच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या कलाकारांचे फोटो शेअर करत सहकार्यासाठी आभार मानले आहेत. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, कार्तिक आर्यन आणि टायगर श्रॉफ या कलाकारांचा समावेश आहे.
-
We thank Aishwarya Rai Bachchan, @TheAryanKartik, and @iTIGERSHROFF for their contribution in the tribute song by @HAPPYPRODINDIA #TuDeshMera dedicated to the Pulwama Martyrs. pic.twitter.com/SXPN8c8bgW
— 🇮🇳CRPF🇮🇳 (@crpfindia) July 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We thank Aishwarya Rai Bachchan, @TheAryanKartik, and @iTIGERSHROFF for their contribution in the tribute song by @HAPPYPRODINDIA #TuDeshMera dedicated to the Pulwama Martyrs. pic.twitter.com/SXPN8c8bgW
— 🇮🇳CRPF🇮🇳 (@crpfindia) July 13, 2019We thank Aishwarya Rai Bachchan, @TheAryanKartik, and @iTIGERSHROFF for their contribution in the tribute song by @HAPPYPRODINDIA #TuDeshMera dedicated to the Pulwama Martyrs. pic.twitter.com/SXPN8c8bgW
— 🇮🇳CRPF🇮🇳 (@crpfindia) July 13, 2019
तर याआधीही एप्रिल महिन्यात सीआरपीएफने अमिताभ बच्चन, आमिर खान आणि रणबीर कपूरचे या गाण्याचं शूटींग करतानाचे फोटो शेअर करत आभार मानले होते. मिळालेल्या माहितीनुसार या गाण्यात एकूण १४ कलाकार झळकणार आहेत. वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी तयार करण्यात येत असलेलं हे गाणं प्रत्येक भारतीय नागरिकाचं मन जिंकेल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.