आज संध्याकाळी डिस्ने अँड हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया हॅन्डल वरून बॉलिवूड मधील सगळ्यात मोठ्या ओटीटी इंटरटेन्मेंट कंटेंट डीलची घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. या डीलसाठी डिस्ने अँड हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मने तब्बल 700 कोटींचा डाव खेळल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. यासाठी अक्षय कुमार, अजय देवगण, अभिषेक बच्चन, वरूण धवन आणि आलिया भट असे सगळे बडे कलाकार एकत्र येऊन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या अपापल्या आगामी सिनेमाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
कोरोना लोकडाऊनच्या काळात अनेक निर्मात्यांनी आधी थिएटर सुरु होण्याची वाट पाहिली. मात्र आधी 30 जूननंतर लॉकडाऊन शिथिल होईल अस सगळ्यांना वाटत होतं. मात्र आता मुंबईसारख्या महानगरात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे थिएटर सुरू व्हायलादेखील सप्टेंबर उजाडण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला जवळ केल्याचं दिसत आहे. त्यानुसार अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमाची 130 कोटींची, अजय देवगणच्या 'भुज' 125 ते 130 कोटींची डील, अजय देवगणची निर्मिती पण राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला 'छलांग' 70 कोटींची डील, अजय देवगणची निर्मिती पण अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेला 'बिग बुल' साधारण 80 कोटींची डील, याशिवाय अभिषेक बच्चनचा 'ल्युडो' हा 80 ते 85 कोटींच डील, सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' 70 कोटींच डील आणि अलियाचे 'गंगुबाई काठियावाड' आणि महेश भट्ट कॅम्पचा 'सडक टू' या सिनेमाची किंमत अजून समजू शकलेली नाही. मात्र या सगळ्या सिनेमाची ओटीटी रिलीज डेट आज जाहीर होण्याची शक्यता आहे.ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठे सिनेमे रिलीज होत असल्याने प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेण्याचा त्यांचा प्रयत्न नक्की यशस्वी होईल यात आता काही शंका वाटत नाही.