ETV Bharat / sitara

अॅन्टी स्पिटिंग मोहिमेला समर्थन देण्याचे भूमीने केले आवाहन, म्हणाली... - Bhumi Pednekar latest news

कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत इतर कलाकारांसोबत भूमी पेडणेकर सक्रिय आहे. सध्या कोविड-१९ संकटावर मात करण्यासाठी स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. कुठेही थुंकण्याची सवय बंद करण्यासाठी अॅन्टी स्पिटिंग मोहीम सुरू झाली आहे. यात भूमीनेही सहभाग घेतला आहे.

Bhumi Pednekar
भूमी पेडणेकर
author img

By

Published : Jun 4, 2020, 4:42 PM IST

मुंबई - करोना महामारीच्या लढाईमध्ये 'अॅन्टी स्पिटिंग' मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन अभिनेत्री भूमी पेडणेकरने केले आहे. कोरोना व्हायरस थुंकण्यामुळे पसरतो याची आठवण भूमीने करून दिली आहे.

भूमी म्हणाली, "आपल्याला कोरोना व्हायरसला हरवायचे आहे आणि यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कुठेही थुंकण्याची सवय सोडून दिली पाहिजे. आपल्याला देश वाचवायचा आहे. सध्या आपला देश कोरोनाच्या संकटात अडकला आहे आणि हा जेवघेणा आजार थुंकण्यामुळे पसरतो."

तिने म्हटले आहे की, "आपण सर्वांनी मिळून शौचालय अभियानाला जोडून देशाला स्वच्छ बनवण्याचा संकल्प केला. त्याच प्रकारे थुंकणे थांबवून देशाला कोरोनापासून मुक्त करण्याचा संकल्प करुयात.."

भूमी अलिकडेच ५ जून या पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने 'वन विश फॉर द अर्थ' या मोहिमेत सहभागी झाली होती. या मोहिमेला अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा आणि करण जोहर यासारख्या बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी समर्थन दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.