ETV Bharat / sitara

'बालिका वधू' मालिकेच्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ

author img

By

Published : Sep 28, 2020, 12:47 PM IST

बालिका वधूचे दिग्दर्शक रामवृक्ष गौड यांनाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. उदरनिर्वाहासाठी रामवृक्ष गौड भाजी विक्रीचे काम करत असून, हे काम करण्यात काहीच कमीपणा वाटत नसल्याचे ते म्हणाले.

रामवृक्ष गौड
रामवृक्ष गौड

आझमगड - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. लॉकडाऊनचा परिणाम सिनेक्षेत्रावरही पडला आहे. बालिका वधूचे दिग्दर्शक रामवृक्ष गौड यांनाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. उदरनिर्वाहासाठी रामवृक्ष गौड भाजी विक्रीचे काम करत असून, हे काम करण्यात काहीच कमीपणा वाटत नसल्याचे ते म्हणाले.

'मी आझमगडला एका चित्रपट दिग्दर्शनासाठी आलो होतो. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्यामुळे परत मुंबईला नाही जाऊ शकलो. तसेच, ज्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आलो होतो. तो चित्रपट यावर्षी होऊ शकणार नाही, असे निर्मात्याने सांगितले. त्यावर मग मी भाजी विकण्याचा निर्णय घेतला. माझे वडील हे भाजीविक्रते होते. मी लहानपणी माझ्या वडिलांसोबत भाजी विकण्याचे काम केले आहे. त्यामुळे हे काम करण्यात काहीच कमीपणा वाटत नसून मी समाधानी आहे, असे ते म्हणाले.

'2002मध्ये माझा मित्र साहित्यकार शाहनवाज खान यांना मदत करण्यासाठी मुंबईला गेलो होतो. सुरुवातीला मी लाइट विभागात काम केले. अनुभव वाढत गेल्यानंतर मी सिनेक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. प्रॉडक्शन आणि दिग्दर्शनाचे काम केले. त्यानंतर 'बालिका वधू'च्या दिग्दर्शनाचे काम केले, असे त्यांनी सांगितले. रामवृक्ष गौड यांनी यशपाल शर्मा, मिलिंद गुंजी, राजपाल यादव आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत काम केले आहे.

सध्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, मार्च ते जुलै या महिन्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे आधीच डगमगलेली अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून उद्योग ठप्प झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.