ETV Bharat / sitara

आणखी पन्नास वर्ष माझ्या वाढदिवसाला यावं लागेल, आशाताईंच्या वाक्याने उपस्थितांमध्ये हशा - प्रार्थना

या व्हिडिओमध्ये आशाताई म्हणाल्या, पुढच्या वर्षीही माझ्या वाढदिवसासाठी या आणि आणखी पन्नास वर्ष तरी हे असंच चालेल. त्यांच्या या वाक्यानं उपस्थितांमध्ये हशा पिकला.

आशा ताईंच्या वाक्याने उपस्थितांमध्ये हाशा
author img

By

Published : Sep 8, 2019, 8:17 PM IST

मुंबई - मेलोडी क्वीन आशा भोसले यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यानंतर आता आशा ताईंनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. वाढदिवस साजरा केल्यानंतर त्या सर्वांचे आभार मानताना यात दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये आशाताई म्हणाल्या, पुढच्या वर्षीही माझ्या वाढदिवसासाठी या आणि आणखी पन्नास वर्ष तरी हे असंच चालेल. त्यांच्या या वाक्यानं उपस्थितांमध्ये हाशा पिकला. आशाताई ८६ वर्षांच्या आहेत. पुढे त्या म्हणाल्या, मात्र, पन्नास वर्ष जर मी जगले, तर तुम्ही सगळेही माझ्यासोबत हवे आहात.

आशा ताईंच्या वाक्याने उपस्थितांमध्ये हाशा

याचसाठी देव तुम्हाला चांगलं जीवन देवो, आरोग्य देवो आणि तुम्ही सर्व नेहमी सुखी रहावेत, अशी प्रार्थना आशा भोसले यांनी यावेळी केली. तुम्ही सर्व इथे आलात, यासाठी धन्यवाद, असेही त्या पुढे म्हणाल्या.

Intro:Body:

https://www.facebook.com/252761965385447/posts/393276574667318/

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.