ETV Bharat / sitara

अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस ठाण्यात दाखल; पायल घोष प्रकरणी हजर राहण्याच्या होत्या सूचना

पायल घोषने अनुरागच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केला आहे. मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये त्या बाबत तक्रार दाखल केली होती. यानंतर वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये अनुराग कश्यप याच्या विरोधात कलम 376 , 354 व 341 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. अनुराग कश्यप याने अनेकदा शारीरिक संबंध बनविण्‍यासाठी बळजबरी केल्याचे पायलने म्हटले आहे.

Anurag Kashyap reaches Versova police station he was summoned in Payal Ghosh case
अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस ठाण्यात दाखल; पायल घोष प्रकरणी हजर राहण्याच्या होत्या सूचना
author img

By

Published : Oct 1, 2020, 11:06 AM IST

मुंबई - अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी चौकशीसाठी अनुराग कश्यप आज पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिसांनी यापूर्वी त्याला समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

पायल घोषने अनुरागच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करून मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये अनुराग कश्यप याच्या विरोधात कलम 376 , 354 व 341 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अनुराग कश्यपची पोलीस चौकशी होत नसल्यामुळे, 27 सप्टेंबर रोजी पायल घोषने यासंदर्भात उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. याबरोबरच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अनुराग कश्यप यांच्या विरोधात पोलीस कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी समन्स बजावत अनुरागला एक ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

अनुराग कश्यप याने अनेकदा शारीरिक संबंध बनविण्‍यासाठी बळजबरी केल्याचे पायलने म्हटले आहे. कश्यप याने हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. यानंतर बॉलिवूडमधील अनेक लोक अनुरागच्या समर्थनार्थ पुढे आले होते. अनुभव सिन्हा यांनी #MeToo चळवळीचे अस्तित्व छळ झालेल्या महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणे हे आहे, त्याचा गैरवापर होऊ नये, असे म्हटले होते. सुरवीन चावलाने चित्रपट निर्माता कश्यप याच्याबरोबर त्यांच्या सेक्रेड गेम्सच्या दोन भागांच्या नेटफ्लिक्स मालिकेत काम केले होते. तिने या दिग्दर्शकाविरोधातील आरोप हा संधीसाधूपणा असल्याचे म्हटले. ‘छुरी’ या लघुपटामध्ये कश्यप आणि चावला यांच्यासोबत असलेल्या टिस्का चोप्रानेही कश्यपची बाजू घेतली होती. चित्रपट निर्माता कश्यप हे पुरुष किंवा महिलेतील प्रतिभेला वाव देणारे आहेत, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा : "पायलचे आरोप बिनबुडाचे; तसे प्रकार ना करतो, ना होऊ देतो", अनुरागचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.