ETV Bharat / sitara

काही क्षणांची समाधानी भेट, चाहत्यांसाठी अमिताभ यांची पोस्ट - fans at jalsa bunglow

अमिताभ यांनी या रविवारी घेतलेल्या चाहत्यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. वो स्नेह आदर के हैं लायक, वे कारण मैं उनका नायक, असं अमिताभ यांनी फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

चाहत्यांसाठी अमिताभ यांची पोस्ट
author img

By

Published : Sep 16, 2019, 10:07 AM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे आजही अनेक चाहते आहेत. अमिताभ यांना भेटण्यासाठी अगदी तरुण वर्गापासून वृद्धांपर्यंत अनेक चाहते रविवारी त्यांच्या जलसा बंगल्यासमोर येत असतात. अमिताभही आपल्या या चाहत्यांसाठी काही वेळ बाहेर येऊन त्यांची भेट घेत असतात.

अमिताभ यांनी या रविवारी घेतलेल्या चाहत्यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. यातील गर्दी पाहता आजही असलेली बिग बींची लोकप्रियता लक्षात येते. यात काही चाहत्यांच्या हातात अमिताभ यांच्या फोटोचे बॅनर तर काही बच्चन यांना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.

  • T 3289 -
    इतवार का दिन , कुछ क्षण भर ही
    संतुष्ट मिलन की प्राप्ति हुई ,

    वो स्नेह आदर के हैं लायक
    वे कारण मैं उनका नायक
    ~ अब pic.twitter.com/uHUZiIHUqf

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) September 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रविवारचा दिवस, काही क्षणांची समाधानी भेट...वो स्नेह आदर के हैं लायक, वे कारण मैं उनका नायक, असं अमिताभ यांनी फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, अमिताभ लवकरच सैरा नरसिम्हा रेड्डी, ब्रह्मास्त्र, गुलाबो सिताबो, झुंड आणि चेहरे या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.