ETV Bharat / sitara

आता 'बिग बी'चा आवाज घुमणार अमेझॉन अलेक्सावर

author img

By

Published : Aug 19, 2021, 10:47 PM IST

Updated : Aug 20, 2021, 2:36 PM IST

अमिताभ बच्चन यांचा आवाज आता अलेक्सावर ऐकायला मिळेल. बच्चन यांच्या आवाजात आता आपल्या आवडीच्या संगीताची फर्माईश करता येईल, अलार्म सेट करता येईल आणि बच्चन यांच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये हवामानाची माहितीही मिळेल.

'बिग बी'चा आवाज घुमणार अमेझॉनने अलेक्सावर

नवी दिल्ली - मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आवाज आता अलेक्सावर ऐकायला मिळेल. बच्चन यांच्या आवाजात आता आपल्या आवडीच्या संगीताची फर्माईश करता येईल, अलार्म सेट करता येईल आणि बच्चन यांच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये हवामानाची माहितीही मिळेल.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, अमेझॉनने अलेक्सा-सक्षम डिव्हाइसेसवर युजर्सना एक अद्वितीय अनुभव निर्माण देण्यासाठी अमिताभ बच्चनसोबत भागीदारीची घोषणा केली होती. अलेक्सावरील हे भारतातील पहिले सेलिब्रिटी व्हॉइस फिचर आहे. अमेझॉनचा डिजिटल सहाय्यक अलेक्सा अॅप व्यतिरिक्त फायर टीव्ही स्टिक अलेक्सा व्हॉइस रिमोटसह, फायर टीव्ही एडिशन अलेक्सा इको डिव्हाइसेसवर उपलब्ध असेल.

"भारतीय ग्राहक इको डिव्हाइसेसवर त्यांच्या अलेक्सा अनुभवात अमिताभ बच्चनचा आवाज जोडणे किंवा अमेझॉन शॉपिंग अॅप (फक्त अँड्रॉइड) वर माईक चिन्ह दाबून एका वर्षासाठी 149 रुपयांच्या प्रास्ताविक किंमतीला निवडू शकतात," असे एका निवेदनात म्हटले आहे.

युजर्सनी खरेदी सुरू करण्यासाठी "अलेक्सा, माझी अमिताभ बच्चनशी ओळख करुन द्या" असे म्हणावे लागेल आणि 'अमित जी' वेक शब्द वापरून बच्चनच्या आवाजाशी संवाद साधता येईल. सेलिब्रिटींच्या अनुभवात बच्चन यांच्या जीवनातील कथा, त्यांच्या वडिलांच्या निवडक कविता, टंग ट्विस्टर्स, प्रेरक कोट आणि इतर गोष्टींचा समावेश आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Last Updated : Aug 20, 2021, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.