मुंबई - चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी व आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडीने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना थिएटरमध्ये परत येण्यास भाग पाडले.
गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर आलियाने प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल आभार मानले. आलियाने तिच्या रोमानिया सहलीतील थ्रोबॅक फोटो शेअर केले ज्यात ती फ्राईजसह शाकाहारी बर्गरचा आनंद घेताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "गंगूबाईला सेंच्यूरीच्या शुभेच्छा आणि आलियाला हॅपी व्हेज बर्गर + फ्राय. सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
भारतीय चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी बुधवारी ही आकडेवारी शेअर केली आणि माहिती दिली की हा चित्रपट महामारीनंतर १०० कोटींचा टप्पा गाठणारा चौथा हिंदी चित्रपट ठरला आहे. त्यांनी ट्विट केले, "आणि गंगुबाई काठियावाडीने आज बुधवारी शतक पूर्ण केले, १०० कोटी हा आकडा गाठणारा चौथा हिंदी चित्रपट ठरला. गंगूबाई काठियावाडीची कमाई शुक्रवार ५.०१ कोटी , शनि 8.20 कोटी, रवि 10.08 कोटी, सोम 3.41 कोटी, मंगळ 4.01 कोटी. एकूण: रु. 99.64 कोटी."
गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची कथा वेश्याव्यवसायात विकलेल्या एका मुलीभोवती फिरते. ही तरुणी नंतर कामाठीपुवा रेड-लाइट एरियाची आणि अंडरवर्ल्डची क्विन बनते. या तरुणीची भूमिका आलिया भट्टने साकारली आहे. यात सुपरस्टार अजय देवगणचीही प्रमुख भूमिका होती.
हेही वाचा - 'पठाण'सोबतचा संघर्ष टाळण्यासाठी ह्रतिक दीपिकाच्या 'फायटर'ची रिलीज डेट बदलली