मुंबई - बॉलिवूडचे लोकप्रिय कपल म्हणून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना ओळखले जाते. बऱ्याच काळापासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, हे दोघेही त्यांच्या नात्याबाबत जाहीरपणे बोलत नव्हते. मात्र, फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यादरम्यान आलियाला 'राजी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यादरम्यान तिने रणबीरवरील प्रेमाची कबुली दिली.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही यंदाच्या फिल्मफेअर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 'संजू' चित्रपटासाठी रणवीरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'राजी'साठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यावेळी आलियाने स्टेजवर पुरस्कार स्विकारताना दिलेल्या भाषणादरम्यान मेघना गुलजार, विकी कौशल,करण जोहर यांचे आभार व्यक्त केले. तर रणबीरसाठीही प्रेम व्यक्त केले. तिने रणवीरला आय लव्ह यू म्हणताच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रु पाहायला मिळाले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनीही या दोघांचा पुरस्कारसोहळ्यादरम्यानचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'हे क्षण फार महत्वाचे असतात. या क्षणांमुळे मनातील तणाव कमी होतो, असे कॅप्शन त्यांनी या फोटोवर दिले आहे'.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
काही दिवसांपूर्वी त्यांचा एक रोमॅन्टिक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ते 'इश्क वाला लव्ह' या गाण्यावर कपल डान्स करताना दिसले होते.
Wait for it! 😍 @aliaa08 #RanbirKapoor#ZeeCineAwards2019 pic.twitter.com/xlManSERMK
— Zee Cine Awards (@ZeeCineAwards) March 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Wait for it! 😍 @aliaa08 #RanbirKapoor#ZeeCineAwards2019 pic.twitter.com/xlManSERMK
— Zee Cine Awards (@ZeeCineAwards) March 19, 2019Wait for it! 😍 @aliaa08 #RanbirKapoor#ZeeCineAwards2019 pic.twitter.com/xlManSERMK
— Zee Cine Awards (@ZeeCineAwards) March 19, 2019
How adorable are they!! 😍😍😍 @aliaa08 #RanbirKapoor @zeecinema #ZeeCineAwards2019 pic.twitter.com/zDDdy68K6R
— Zee Cine Awards (@ZeeCineAwards) March 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">How adorable are they!! 😍😍😍 @aliaa08 #RanbirKapoor @zeecinema #ZeeCineAwards2019 pic.twitter.com/zDDdy68K6R
— Zee Cine Awards (@ZeeCineAwards) March 19, 2019How adorable are they!! 😍😍😍 @aliaa08 #RanbirKapoor @zeecinema #ZeeCineAwards2019 pic.twitter.com/zDDdy68K6R
— Zee Cine Awards (@ZeeCineAwards) March 19, 2019
रणबीर आणि आलिया लवकरच 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात झळकणार आहेत. आलियाचा 'कलंक' चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. यावर्षी बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये आलिया भट्टची वर्णी लागली आहे.