मुंबई - अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' आणि आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हे दोन चित्रपट २०१० मध्ये ख्रिसमसला एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्यांची बॉक्स ऑफिसवरची होणारी टक्कर अटळ मानली जात आहे. अक्षय कुमार आणि आमिर खान यांचे हे बिग बजेट चित्रपट आहेत, त्यामुळे सर्वांची नजर त्यावर टिकून आहे.
अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट क्षिणेमधील सुपरहिट 'वीरम' या चित्रपटाचा रिमेक आहे. तर आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा रिमेक आहे. या दोन चित्रपटांची होणारी टक्कर सिनेजगतात आतापासूनच चर्चेचा विषय ठरला आहे.
एका प्रसिध्द वर्तमानाशी बोलताना अक्षय कुमार म्हणाला, ''आमच्याकडे ५२ शुक्रवार असतात. त्यात बॉलिवूडचे २०० चित्रपट, हॉलिवूडचे ५० आणि दाक्षिणात्य आणि रिलजनल असे सिनेमा रिलीज होत असतात. अशात जर दोन चित्रपट एकत्र रिलीज होणार असतील तर आपल्याला आनंद व्हायला हवा.''
अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'च्या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला होता. फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करीत आहेत.