हैदराबाद: ऐश्वर्या राय बच्चन ३ जानेवारी रोजी पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसमवेत शहरात आली. रामोजी फिल्म सिटीमध्ये मणिरत्नमच्या 'पोन्नीईन सेल्वान'च्या शूटिंगमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या सहभागी होणार आहे.
मणीरत्नम यांनी २०१९ च्या डिसेंबर महिन्यात थायलंडमध्ये 'पोन्नीईन सेल्वान'च्या शूटिंगला सुरुवात केली होती. यापूर्वी निर्माते कार्ती, जयम रवि आणि ऐश्वर्या लेख्मी यांच्यासह ९० दिवसांचे शुटिंग शेड्यूल ठरवले होते. पहिले शेड्यूल नीट पार पडल्यानंतर कोरोना व्हायरसची साथ सुरू झाली आणि 'पोन्नीईन सेल्वान' चे शुटिंग थांबवावे लागले होते.
निर्मात्यांनी आता ६ जानेवारीपासून रामोजी फिल्म सिटीमध्ये या ऐतिहासिक नाट्यमय चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. दुसऱ्या शेड्यूलमध्ये इतर कलाकारांसह ऐश्वर्या हैदराबादमध्ये शुटिंगच्या अगोदर काही दिवसापूर्वीच दाखल झाली आहे. ती या शुटिंगसाठी एक महिना इथेच राहणार असून चित्रपट शुटिंग आटोपल्यानंतरच ती मुंबईला परतेल.
'पोन्नीईन सेल्वान' या चित्रपटात ऐश्वर्या राय डबल रोलमध्ये दिसणार आहे. ती मणीरत्नम यांच्यासोबत १० वर्षानंतर काम करीत आहे. तिने मणीरत्नम यांच्या 'इरुवर' या चित्रपटातून आपल्या करियरची सुरूवात केली होती. त्यानंतर 'गुरू' आणि 'रावण' यासारख्या चित्रपटातूनही काम केले होते.
हेही वाचा -विजय सेतुपतीशी मतभेदामुळे आमिरने सोडला 'विक्रम वेधा'चा रिमेक?
'पोन्नीईन सेल्वान' हे त्याच नावाच्या तामिळ कादंबरीचे सिनेमॅटिक रूपांतर आहे. मेगा-बजेट असलेल्या या मल्टीस्टारर चित्रपटाची निर्मिती मणिरत्नम आणि लिका प्रॉडक्शन यांनी संयुक्तपणे केली आहे.