ETV Bharat / sitara

शाहिदसाठी अभिनय करणे हे दूरचे स्वप्न होते, म्हणाला, 'देव दयाळू आहे' - शाहिद कपूर म्हणतो 'देव दयाळू आहे'

अष्टपैलू अभिनेता शाहिद कपूरने म्हटले आहे की, त्याच्या कारकिर्दीत अनेक भूमिका करण्याची संधी मिळाली. यात त्याला धन्यता वाटते कारण असे स्वप्न त्याने पाहिले नव्हते. सोशल मीडियावरील प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये तो चाहत्यांशी संवाद साधत होता.

बॉलिवूड स्टार शाहिद कपूर
बॉलिवूड स्टार शाहिद कपूर
author img

By

Published : Sep 28, 2021, 10:50 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार शाहिद कपूर म्हणतो की तो अभिनेता होण्याचे आपले स्वप्न साकारता आले याबद्दल तो धन्य समजतो. सोमवारी ट्विटरवर प्रश्न आणि उत्तर (प्रश्नोत्तर) सेशनदरम्यान शाहिदला त्याची महत्वाकांक्षा काय आहे असे विचारण्यात आले. त्याच्या उत्तरात शाहिद म्हणाला, की त्याच्या कारकिर्दीत विविध संधी मिळाल्यामुळे त्याला आशीर्वाद मिळाला आहे. "देव दयाळू आहे. मी अभिनेता होऊ शकलो यात धन्यता समजतो. हे एक दूरचे स्वप्न होते. प्रत्येक संधी आणि मी साकारलेल्या प्रत्येक पात्राला न्याय देण्याची महत्वाकांक्षा आहे. दिल से काम करना है (मला मनापासून काम करायचे आहे)., "त्याने ट्विट केले.

अभिनेता पंकज कपूर आणि नीलिमा अजीमचा मुलगा असलेल्या शाहिदने 2003 मध्ये रोमँटिक कॉमेडी इश्क विश्कने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि हळूहळू कमिने, जब वी मेट, हैदर आणि उडता पंजाब सारख्या चित्रपटांसह फिल्म इंडस्ट्रीतील अव्वल कलाकारांपैकी एक म्हणून उदयास आला. 2019 मध्ये शाहिद कपूरचा कबीर सिंह हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला होता.

शाहिद आगामी जर्सी या चित्रपटामध्ये मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याच नावाने 2019 मध्ये तेलुगू भाषेत ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटाचा हिंदी रिमेक 31 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होईल. "हा माझा चित्रपटनिर्मितीचा सर्वोत्तम अनुभव आहे. तो तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्याची वाट पाहू शकत नाही."असेही तो म्हणाला.

हेही वाचा - 'सर्वकाही गमावण्याच्या' भीतीने परिवर्तनाच्या प्रवासाला चालना मिळाली लिझेल रेमो डिसुझा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.