सिडनी - सतत होणाऱ्या टीकेमुळे समाज माध्यम स्त्रियांसाठी दिवसेंदिवस अनादर होणारे माध्यम ठरत आहे. यावर मात करण्यासाठी क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने (क्यूयूटी) अत्यंत अचूक अल्गोरिदम विकसित केला आहे. त्यामुळे ट्विटर महिलांना लक्ष्य करणाऱ्या पोस्ट शोधून काढणे शक्य होणार आहे. या अलगोरिदमच्या मदतीने लाखो ट्विटमधून अनादर करणारा मजकूर शोधून काढणे शक्य आहे.
क्यूयुटीच्या संशोधक रिची नायक, निकोलस सुझर आणि मोहम्मद अब्दुल बशर यांनी अल्गोरिदमच्या सहाय्याने महिलांवरील अपमानजक ट्विट शोधून करणारी यंत्रणा विकसित केली आहे. त्यासाठी क्यूयूटीमधील विज्ञान, अभियांत्रिकी, विधी शाखा आणि डिजील मिडिया सेंटरचे फॅकल्टी यांनी एकत्रितपणे काम केले. त्यासाठी १० लाख ट्विट हे मायनिंग करण्यात आले. त्यासाठी महिलांविरोधात वापरण्यात येणाऱ्या काही कीवर्डचा सर्च करण्यात आला.
मशिन लर्निंगमुळे समाज माध्यम कंपनीला आक्षेपार्ह असलेले ट्विट स्वयंचलितपणे शोधून काढणे शक्य होणार आहे. त्यातून महिलांचा अपमान टाळणे शक्य होणार असल्याचे संशोधक नायक यांनी सांगितले.
या संशोधकांच्या गटाने डीप लर्निंगचा अल्गोरिदम वापरला आहे. हा अल्गोरिदम लाँग शॉर्ट टर्म मेमरी (एलएसटीएम) नावाने ओळखला जातो. या पद्धतीने भविष्यात वंशद्वेष व दिव्यांग व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह ट्विट शोधून काढणे शक्य होणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.