मुंबई : जेव्हा कधी एखादा मोठा कार्यक्रम किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचा वाढदिवस किंवा आणखी काही असेल तेव्हा गुगल डूडल बनवून ते साजरे करतो. आजचे 19 मार्च 2023 चे डूडल मॅक्सिकन रसायनशास्त्रज्ञ डॉ. मारियो मोलिना यांच्यावर आहे. आज त्यांचा 80 वा वाढदिवस आहे. त्यांनी पृथ्वीचा ओझोन थर वाचवण्यासाठी विविध देशातील सरकारांना एकत्र आणण्याचे काम केले होते. डॉ. मोलिना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे शोधून काढले होते की, कशी रसायने पृथ्वीच्या ओझोन कवचाचा नाश करतात, ज्या ओझोनमुळे मानव, वनस्पती आणि वन्यजीवांना हानिकारक अतिनील प्रकाशापासून संरक्षण मिळते. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना 1995 सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता.
जाणून घ्या डॉ. मारियो मोलिना यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी :
- डॉ. मोलिना यांचा जन्म 19 मार्च 1943 रोजी मॅक्सिको सिटी येथे झाला. लहानपणी त्यांना विज्ञानाचे इतके वेड होते की त्यांनी चक्क आपल्या बाथरुमचे तात्पुरत्या प्रयोगशाळेत रूपांतरण केले होते.
- डॉ. मोलिना यांनी मॅक्सिकोच्या नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीमधून रासायनिक अभियांत्रिकीची पदवी आणि जर्मनीच्या फ्रीबर्ग विद्यापीठातून पुढची पदवी मिळवली.
- शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे पोस्टडॉक्टरल संशोधन करण्यासाठी अमेरिकेत गेले. त्यानंतर ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे गेले.
- 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस, डॉ. मोलिना यांनी पृथ्वीच्या वातावरणावर कृत्रिम रसायनांचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला. पुढे त्यांनी यावर संशोधन सुरू केले.
- क्लोरोफ्लुरोकार्बन्स (एअर कंडिशनर्स, एरोसोल स्प्रे आणि इतरांमध्ये आढळणारे रसायन) ओझोनचे विघटन करत आहेत आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचू देत आहेत, हे त्यांनी त्यांच्या संशोधनाद्वारे शोधून काढले.
- त्यांनी आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी याचे निष्कर्ष नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केले. ज्यामुळे त्यांना नंतर रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देखील मिळाले.
हे ही वाचा : World Water Day 2023 : जल है तो जीवन है, जाणून घ्या काय आहे जल दिनाचा इतिहास आणि महत्त्व