ETV Bharat / science-and-technology

Elon Musk Creates XAI Company : मायक्रोसॉफ्टच्या ओपन एआयला टक्कर देण्यासाठी एलन मस्कने सुरू केली एक्स एआय कंपनी - चॅट जीपीटी

एलन मस्क आणि मायक्रोसॉफ्टच्या ओपन एआय यांच्यातील वाद आता चांगलाच रंगला आहे. त्यामुळे ओपन एआयला टक्कर देण्यासाठी एलन मस्क यांनी एक्स एआय ही कंपनी सुरू केली आहे.

Elon Musk Creates XAI Company
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 15, 2023, 12:30 PM IST

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून एलन मस्क आणि ओपन एआयमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र मानवी कल्याणासाठी एआय घातक असल्याचा दावा करणाऱ्या एलन मस्क यांनीच आता एआय कंपनी सुरू केली आहे. मायक्रोसॉफ्टच्या ओपन एआयला टक्कर देण्यासाठी एलन मस्कने एक्स एआय ही कंपनी सुरू केली आहे. चॅट जीपीटीच्या ChatGPT युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रोत्साहन देईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. टेक्सासमधील नेवाडा येथे ही कंपनी एलन मस्क यांनी सुरू केली आहे. या कंपनीमध्ये एलन मस्क हे एकमेव संचालक आहेत. तर एलन मस्कच्या कार्यालयाचे संचालक जेरेड बिरचॉल हे सचिव आहेत.

ओपन एआयसोबत एलन मस्कचा वाद : एलन मस्क यांनी मायक्रोसॉफ्टच्या ओपन एआयला टक्कर देण्यासाठी एक्स एआय या कंपनीची स्थापना केली आहे. मात्र सुरुवातीला एलन मस्कनेच मायक्रोसॉफ्टच्या ओपन एआय या कंपनीत 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती. मात्र त्यानंतर एलन मस्कने या कंपनीतून काढता पाय घेतला होता. त्यानंतर एलन मस्क यांच्यासह एक हजारावर उद्योजकांनी खुले पत्र लिहत ओपन एआय हे मानवी कल्याणासाठी हानिकारक असल्याचा दावा केला होता. त्यावरुन एलन मस्क आणि ओपन एआयच्या सीईओ यांच्यात आरोप प्रत्यारोपही झाले आहेत. विशेष म्हणजे एलन मस्कने स्थापन केलेल्या एक्स एआय कंपनीसाठी 100 दशलक्ष समभागांची विक्री अधिकृत केल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एलन मस्कचा ओपन एआयवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न : अलिकडच्या काही काळात चॅट जीपीटी ChatGPT आणि जीपीटी ४ GPT-4 जगभरात लोकप्रिय झाले आहेत. मार्चमध्ये अ‍ॅपलचे Apple सहसंस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक यांच्यासह अनेक उद्योजकांनी खुले पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी सर्व AI लॅबला किमान 6 महिन्यांसाठी GPT-4 पेक्षा अधिक शक्तिशाली AI प्रणालींचे प्रशिक्षण त्वरित थांबवण्यास सांगितले होते. यावेळी 2018 च्या सुरुवातीस एलन मस्कने OpenAI वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कंपनीच्या वतीने करण्यात आला. मात्र सॅम ऑल्टमन आणि OpenAI च्या इतर संस्थापकांनी मस्कचा प्रस्ताव नाकारल्याचे वृत्त समोर आल्याने हे खुले पत्र आल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा - Truecaller App New Feature : ट्रू कॉलरने आयफोन वापरकर्त्यांसाठी आणले नवीन फिचर, जाणून घ्या काय आहेत फायदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.