नवी दिल्ली : जगातील अनेक देश चंद्रावर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी चंद्र मोहिमेवर काम करत आहेत. चीनचे वर्चस्ववादी धोरण आता नवे भय निर्माण करत आहे. चीन आपल्या चंद्रमोहिमेसह चंद्रावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे. चीनच्या या निर्णयामुळे अमेरिकेची अस्वस्थता वाढली आहे.
चीन मालकी हक्क सांगू शकतो : नासाच्या उच्च अधिकार्याने इशारा दिला आहे की, अमेरिकेने चीनसोबत अंतराळात वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच चंद्रावरील साधन संपत्तीवर वर्चस्व न गाजवण्याचा सल्ला देत आहे. फ्लोरिडाचे माजी अंतराळवीर आणि सिनेटर असलेले नासा प्रशासक बिल नेल्सन यांनी एका निवेदनात इशारा दिला आहे की, चीन आगामी काळात चंद्राच्या साधन-समृद्ध भागांवर मालकी हक्क सांगू शकतो. त्याचवेळी, अमेरिकेचा एक वर्ग अंतराळ शर्यतीत अधिक उडी घेण्याच्या विरोधात आहे.
हेही वाचा : चीन आपल्या स्पेस स्टेशनसाठी तीन अंतराळवीर पाठवणार, मानवयुक्त चंद्र मोहिमेच्या योजनांचे अनावरण
आपल्याला चंद्रावर स्थान मिळाले नाही तर : जर्मन माध्यमाच्या माहितीनुसार नेल्सन यांनी म्हटले आहे की, आम्ही अंतराळ शर्यतीत आहोत. येत्या काळात आपल्याला चंद्रावर स्थान मिळाले नाही तर त्यामुळे आश्चर्य वाटायला नको. आम्ही इथे आहोत, हा आमचा प्रदेश आहे, असे चीन कधीही सांगू शकेल. अशी शक्यता नाकारता येत नाही. नेल्सनने दक्षिण चीन समुद्रातील बेटांवर चीनच्या आक्रमणाचा दाखला देत म्हटले आहे की, बीजिंगने आपल्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षेचा पुरावा म्हणून लष्करी तळ स्थापन केले आहेत. तुम्हाला शंका असल्यास, त्यांनी स्प्रेटली बेटांवर काय केले ते पहा.
स्वत:चे लुनार स्टेशन उभारण्याचे चीनचे लक्ष्य : मागील 2022 मध्ये, आपल्या अंतराळ कार्यक्रमांतर्गत, चीनने पृथ्वीभोवती फिरणाऱ्या स्पेस स्टेशनच्या मदतीने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि तेथे नमुने गोळा करण्याच्या अनेक योजनांवर काम सुरू केले आहे. 2025 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक स्वत:चे लुनार स्टेशन उभारण्याचे चीनचे लक्ष्य आहे. चीन अंतराळ वाहतुकीच्या मदतीने चंद्रावर क्रू पाठवण्याच्या तयारीत आहे. अभ्यासासाठी, चीनने या दशकाच्या अखेरीस टायकॉनॉट्सला चंद्रावर उतरवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे चीनने आधीच जाहीर केले आहे. त्याचवेळी, नासाने नुकतेच चंद्राच्या छायाचित्रांसाठी 26 दिवसांचे आर्टेमिस I मिशन पूर्ण केले आहे. भविष्यात चंद्राविषयी अधिक अचूक माहितीच्या मदतीने चंद्रावरील हालचाली वाढवणे हा त्याचा उद्देश आहे.