ETV Bharat / opinion

झायडस कॅडिलाकडून झायकोव्ही-डी औषधाच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या पूर्ण - झायडस कोरोना लस

कोविड-१९ ला रोखण्यासाठी झायकोव्ही-डी ही प्लाझ्मिड डीएनए लस पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांमध्ये सुरक्षित असल्याचे आढळले असून त्यामुळे कोणताही विपरित परिणाम दिसला नाही, असे झायडस कॅडिलाने जाहिर केले आहे. कंपनीने दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या ६ ऑगस्ट २०२० पासून सुरू केल्या आहेत.

Zydus Cadila announces completion of dosing in phase I clinical trial of ZyCoV-D
झायडस कॅडिलाकडून झायकोव्ही-डी औषधाच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या पूर्ण
author img

By

Published : Aug 14, 2020, 4:26 PM IST

अहमदाबाद : भारतीय औषध क्षेत्रातील दिग्गज कंपनी झायडस कॅडिलाने बुधवारी असे जाहिर केले आहे की, कोविड-१९ ला रोखण्यासाठी त्यांनी विकसित केलेली प्लाझ्मिड डीएनए लस पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांमध्ये सुरक्षित असल्याचे आढळले आहे. तिचा स्वयंसेवकांवर कोणताही विपरित परिणाम आढळून आला नाही. कंपनीने आता दुसऱ्या टप्यातील क्लिनिकल चाचण्या आजपासून सुरू केल्या आहेत. १५ जुलै २०२० रोजी पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या असून सुदृढ स्वयंसेवकांवर या लसीचा कोणताही विपरित परिणाम दिसलेला नाही.

अगोदर, क्लिनिकलपूर्व विषारीपणाची चाचणी घेण्याच्या अभ्यासात, ही लस सुरक्षित, प्रतिकारशक्ति निर्माण करणारी आणि कसलीही गुंतागुंत निर्माण न करणारी अशी असल्याचे आढळले, असे कंपनीने म्हटले आहे. प्राण्यांवर केलेल्या चाचणीत ही लस विषाणुचा प्रभाव नष्ट करणारी प्रतिपिंडे उच्च स्तरावर काढून घेण्यात सक्षम ठरली होती.

झायडस कॅडिलाचे अध्यक्ष पंकज आर पटेल यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील लसीची सुरक्षितता सिद्ध होणे हा एक महत्वाचा मैलाचा दगड आहे. पहिल्या टप्प्यातील क्निलिकल चाचण्यांदरम्यान,

लस दिल्यानंतर सुरक्षिततेसाठी पुढे ७ दिवस क्लिनिकल औषधी युनिटमध्ये सर्व स्वयंसेवकांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आणि लस अत्यंत सुरक्षित असल्याचे आढळले. आता आम्ही दुसऱ्या टप्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. मोठ्या लोकसंख्येवर लसीची सुरक्षितता तसेच प्रतिकारशक्ति निर्माण करण्यासाठीची क्षमता यांचे मूल्यांकन करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या आहेत.

पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सर्व स्वयंसेवकांमध्ये लसीची ७ दिवस सुरक्षितता नोंदवली गेल्याने स्वायत्त डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डनेही लस धोकादायक नसल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. क्लिनिकल चाचण्यांमध्ये लसीच्या सुरक्षिततेच्या पैलूंवर देखरेख करण्यासाठी या बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी एक हजाराहून अधिक सुदृढ आणि प्रौढ स्वयंसेवकांवर झायकोव्ही-डीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यात येईल. झायकोव्ही-डीसह, कंपनीने देशात डीएनए लस तयार करण्यासाठीचे तंत्रज्ञान यशस्वीपणे स्थापित केले आहे. यासाठी कंपनीने पेशीमध्ये स्वतःचा गुणाकार न करणारा, एकात्मिक नसलेला तसेच ज्यात लसीला सुरक्षित करणारे गुणसूत्र आहे, अशा प्लाझ्मिडचा वापर केला आहे. प्लाझ्मिड म्हणजे पेशीमधील लहान, डीएनए रेणू असतो, जो स्वतंत्रपणे स्वतःचा गुणाकार करू शकतो. गुणसूत्रांमध्ये फेरफार करण्यासाठी सहसा प्रयोगशाळांमध्ये या प्लाझ्मिडचा वापर केला जातो.

आणखी पुढे, कोणताही सदिश परिणाम नसलेले आणि कोणत्याही संसर्गकारी घटकाचा अभाव असलेले असे हे तंत्रज्ञान लस उत्पादनस्नेही असून त्यासाठी जैविक सुरक्षेच्या गरजा किमान आहेत.

झायकोव्हीडी तंत्रज्ञानात लसीच्या स्थिरतेमध्ये सुधारणा दिसली असून तिच्या पुरवठा साखळीचे निकष फार कडक नसल्याने देशाच्या अतिदुर्गम भागातही सहजतेने नेली जाऊ शकते. आणखी पुढे, हे तंत्रज्ञान लसीत बदल झाला तरीही ती सुरक्षित असल्याची सुनिश्चिती करण्यासाठी आणि त्याअनुसार लसीमध्ये बदल करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा दोन आठवड्यांच्या आत झपाट्याने वापर करता येतो.

प्लाझ्मिड डीएनए, जेव्हा यजमान पेशीमध्ये घुसवले जाते, त्याचे रूपांतर व्हायरल प्रोटिनमध्ये होते आणि मानवी प्रतिकार व्यवस्थेच्या पेशीसारख्या आणि नैसर्गिक द्रवपदार्थाच्या अशा दोन्ही बाबतीत जोरदार प्रतिकारशक्ति निर्माण करते, जी रोगापासून संरक्षण करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. झायकोव्हीडी विकसित करण्यात भारत सरकारच्या नॅशनल बायोफार्मा मिशन, बीआयआरएसी, जैवतंत्रज्ञान विभाग यांचे सहाय्य झाल्याचे मान्य करते. आतापर्यंतच्या दुर्लक्षित राहिलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, झायडस लस संशोधन कार्यक्रम, झायडस कॅडिलाच्या लस तंत्रज्ञान केंद्राकडे व्हायरल, टॉक्झॉईड, पॉलिसॅक्राईड, संयुगे आणि इतर लसी विकसित आणि उत्पादित करण्यासाठी व्यापक क्षमता आहे. प्रत्यक्षात, देशात २०१० च्या स्वाईन फ्ल्यूच्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण एतद्देशीय बनावटीची लस विकसित आणि उत्पादित करणारी झायडस ही पहिली कंपनी होती.

यापूर्वीही, झायडसने टेट्राव्हॅलंट मोसमी इन्फ्ल्युएंझा लस( एतद्देशीय तंत्रज्ञान वापरून विकसित आणि व्यापारीकरण करणारी पहिली कंपनी), इनॅक्टिव्हेटेड रॅबिज लस(डब्ल्यूएचओने पूर्व मान्यता दिलेली), व्हॅरिसेला लस(एतद्देशीय तंत्रज्ञान वापरून लस विकसित करणारी आणि बाजारपेठीय अधिकृतता मिळवणारी पहिली कंपनी), गोवर(एमआर, एमएमआर,मीझल्स), विषमज्वर लस, पेंटाव्हॅलंट लस(डीपीटी-एचईपीबी-एचआयबी) अशा असंख्य लसी एतद्दशीय तंत्रज्ञान वापरून यशस्वीपणे विकसित केल्या आहेत.

कंपनीमध्ये सध्या गोवर-गालगुंड-रूबेला-कांजिण्या(एमएमआरव्ही), पेशीजालाची निरूपद्रवी वाढ रोखण्यासाठी, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस ई लस तयार करण्याचे काम विविध टप्प्यात चालू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.