ETV Bharat / opinion

यूव्हीए डॉक्टरांचा कोविड-१९ वरील मुलांसाठीच्या 'वुई आर गोईंग टु बी ओके' पुस्तकासाठी सन्मान..

author img

By

Published : May 27, 2020, 5:37 PM IST

इमोरी ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटने लहान मुलांसाठीच्या घेतलेल्या ई-बुक स्पर्धेत इबोनी जेड हिल्टन (एमडी) आणि ली-अन वेब (एमडी) या युव्हीए डॉक्टरांनी लिहिलेल्या 'वुई आर गोईंग टु बी ओके' या पुस्तकाने बाजी मारली आहे. हे लहान मुलांचे पुस्तक असून, त्यात कोविड-१९मुळे वेगवेगळ्या वर्णांच्या समुदायाला कोविडने कसे त्रस्त केले आहे, याचे वर्णन केले आहे.

UVA physicians honoured
यूव्हीए डॉक्टरांचा कोविड-१९ वरील मुलांसाठीच्या 'वुई आर गोईंग टु बी ओके' पुस्तकासाठी सन्मान..

हैदराबाद - यूव्हीए हेल्थमधील दोन डॉक्टरांचा 'इमोरी ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूट'च्या कोविड-१९ मुलांच्या ई-बुक स्पर्धेत सन्मान करण्यात आला आहे. एका वृत्तानुसार, युव्हीए डॉक्टर्स, इबोनी जेड हिल्टन (एमडी) आणि ली-अन वेब (एमडी) यांनी कोविड-१९ने वेगवेगळ्या वर्णांच्या समुदायांना विषम प्रमाणात त्रस्त केले असल्याबद्दल पुस्तक लिहिले आहे. 'वुई आर गोईंग टु बी ओके' पुस्तक इमोरी ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या कोविड-१९ मुलांच्या ई-बुक स्पर्धेत २५६ पैकी पहिल्या ५ अव्वल पुस्तकांत होते.

हिल्टन आणि वेब यांनी अशली कोरिन वेब या चित्रकाराबरोबर एकत्रितपणे हे पुस्तक तयार केले. त्यांनी पार्कर या तरूण आफ्रिकन-अमेरिकन मुलाची कथा रेखाटली असून कोविड-१९ बाबत त्याला आपल्या आईवडिलांकडून माहिती झाल्यानंतर महामारी त्याचा रोजचा दिनक्रम कसा बदलतो, याचे वर्णन केले आहे. हे विनामूल्य पुस्तक आरोग्यसंपन्न रहाण्यासाठी एक गाईड म्हणून आणि मुलांना महामारी आणू शकणाऱ्या तणाव आणि दुःखाचा सामना करण्यासाठी सहाय्य करणारे साधन असे दुहेरी उपयोगाचे आहे.

हिल्टन म्हणाले की भीतीचा शत्रु हा माहिती आहे,हे ठाऊक झाल्याने माझ्या प्रेरणेला इंधन मिळाले. त्यांनी इतरही दोन मुलांची पुस्तके लिहिली आहेत. म्हणजे या पुस्तकाचा उद्देश्य हा माहिती करून देणे आणि सक्षम करणे त्याचबरोबर त्यांच्या कमकुवतपणाची माहिती देणे हा आहे. याव्यतिरिक्त, मुलांना आपल्या दुःख आणि उत्तेजना या भावनाना वाट मोकळी करून देण्याचाही आहे, जे विशेषत्वाने महत्त्वाचे होते. दुर्दैवाने, काही मुलांना आपल्या आई किंवा वडिलांना किंवा भाऊबहिणीला गमावण्याचा अनुभव येईल, हे आम्हाला माहित आहे आणि त्यांनी आपले विचार लिहून काढावेत किंवा त्यांचे चित्र काढावे, असे आम्हाला वाटत होते. त्यांच्या दुः खावर हळुवार फुंकर घालण्याचा सुरक्षित अवकाश देण्यासाठी ते आहे, असे हिल्टन यांनी पुढे सांगितले.

५ ते ९ या वयोगटातील मुलांसाठी या पुस्तकाची रचना केली असून कोविड-१९ दरम्यान आरोग्यसंपन्न कसे रहावे, याबाबत माहिती पुरवली आहे. त्याचबरोबर तरूण मुलांसाठी मानसिक आरोग्याचेही मार्गदर्शन केले आहे. प्रकल्पाच्या सर्वात लाभदायक पैलू हा आहे की तो कलेचा अर्थपूर्ण आविष्कार तयार करण्यास सक्षम ठरला तसेच सर्व समुदायांपर्यंत, विशेषतः वर्णाच्या समुदायांकडे पोहचू शकला, असे वेब म्हणाल्या.

मी दोन मुलांची आई असल्याने, मला कृष्णवर्णीय आणि ब्राऊन मुलांसाठी मुख्य पात्रे त्यांच्यासारखी असली पाहिजेत, हे मला माहित आहे. मुले त्यांच्या भावना साधारण आहेत, असे ठाऊक झाल्यावर आश्वस्त होतात, अशी मला आशा आहे. मला आशा आहे की हे पुस्तक त्यांना त्यांच्या भावनांची जाणीव करून देण्यास आणि टिप्स आणि वर्कबुक शैलीतील पुस्तकामुळे आपले विचार कृतीतून व्यक्त करण्यासही सुसज्ज करेल, असे वेब यांनी पुढे सांगितले.

आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या आघाडीच्या डॉक्टर असल्याने, महामारीने विषम प्रमाणात तडाखा दिलेल्या आफ्रिकन-अमेरिकन आणि हिस्पॅनिक समुदायाला त्या सहाय्य करत आहेत, हे उल्लेखनीय आहे. हिल्टन आणि वेब यांचा असा विश्वास आहे की आफ्रिकन-अमेरिकन कुटुंबाच्या दृष्टिकोनातून ही कथा सांगणे महत्वाचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.