ETV Bharat / opinion

भारत-नेपाळ सीमावाद : इतिहास आणि वर्तमान

author img

By

Published : Jul 19, 2020, 4:51 PM IST

भारत नेपाळ सीमावाद सध्या चर्चेत आला आहे. या वादाचे मूळ कुठे आहे, याबाबत लिहितायत प्रसिद्ध लेखक गणेश शैली.

Sagauli treaty of Nepal, more than a bend in the river
भारत आणि नेपाळ सीमावाद : इतिहास आणि वर्तमान

हैदराबाद : सध्या भारतीय लष्कराचा प्रतिष्ठित विभाग असणाऱ्या काहीशा योद्धांच्या पुर्वजांनी 1765 साली पृथ्वीनारायण यांच्या नेतृत्वाखाली भोवतालच्या पर्वतीय जमातींमध्ये आपले सामर्थ्य सिद्ध करण्यास सुरुवात केली. पृथ्वीनारायण हे युरोपियन शिस्त आणि शस्त्रास्त्रांचे कौतुक करत त्याचा लाभ करुन घेणारे पहिले नेपाळी व्यक्तिमत्व होत.

या योद्ध्यांनी काठमांडू, ललितापतन आणि भाटगांव ताब्यात घेतले; आणि पृथ्वीनारायण यांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी आणि नवजात बालकाच्या वतीने राज्य चालविणाऱ्या भावाच्या नेतृत्वाखाली कुमाऊंपर्यंत आपला विस्तार नेला. त्यानंतर, 1790 साली त्यांनी अलमोरा ताब्यात घेतले आणि रामगंगापर्यंत संपुर्ण देशावर राज्य प्रस्थापित केले.

कुमाऊंनतंर आपला मोर्चा पश्चिमेकडे वळविण्यास सुरुवात करत गुरखांनी गढवालवर आक्रमण केले. मात्र, नेपाळवर चिनी आक्रमणाच्या बातमीने त्यांचा विजय लांबला. परिणामी, स्वतःच्या राष्ट्र संरक्षणात सहाय्य करण्यासाठी या आक्रमक सैन्यदलास गढवालमधून माघार घ्यावी लागली. मात्र, पुन्हा काही वर्षांनी गुरखा आक्रमणाची लाट पश्चिमकडे दाखल झाली. फेब्रुवारी 1803 साली गढवालच्या राजाची तत्कालीन राजधानी श्रीनगरवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर राजाने दक्षिणकडे माघार घेतली. बाराहाट येथे त्याने निष्फळ प्रयत्न केला, परंतु तिथून त्याला प्रथम डून येथे आणि नंतर सहारनपूर येथे पाठवण्यात आले. येथे आल्यानंतर त्रासलेला राजा प्रद्युम्न शाह याने आपली सर्व संपत्ती आणि सिंहासन गहाण ठेऊन काही लाख रुपयांची उभारणी केली. या निधीच्या सहाय्याने त्याने नव्याने आपले सैन्य उभारले, डून येथे परतला आणि आक्रमण करणाऱ्या समुहावर हल्ला केला. त्यावेळी या समुहाने उमर सिंह थापा यांच्या नेतृत्वाखाली देहरा ताब्यात घेतले होते. मात्र, येथे राजा पराभूत होऊन मृत्यू पावला.

जे.बी. फ्रेजर यांनी आपल्या 'हिमालयन माऊंटेन्स' या पुस्तकात नमूद केले आहे की, गढवाल यांचा शेवटचा राज्यकर्ता प्रद्युम्न शाह याच्यावर येणारे संकट, गुरखा शक्तीचा उदय आणि अखेर ब्रिटीश सैन्याकडून झालेला पराभव इत्यादी घटनांची भविष्यवाणी यमनोत्रीपासून फार लांब अंतरावर नसलेली अरुंद दरी पालीगढ येथील पुजाऱ्यांनी केली होती.

एकीकडे ब्रिटीश सैन्य शिवालिक रांगांच्या दक्षिणकडील कड्यापर्यंत पोहोचले तर याचवेळी गुरखांची फौज त्याच डोगररांगांच्या उत्तरेकडील उतारांवर दाखल आली होती. कर्नल बर्न यांनी सहारनपूरकडे कूच केली तर याचवेळी उमर सिंह थापा यांनी ऑक्टोबर 1803 मध्ये देहरा ताब्यात घेतले.

गुरख्यांची राजवट भयंकर होती. यामुळे अनेक ठिकाणच्या मूळ रहिवाशांना स्थलांतरित होण्याची वेळ आली. गुलामगिरी मोठ्या प्रमाणात वाढली; सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना आजीवन गुलामगिरीची शिक्षा देण्यात येत. अन्याय आणि क्रौर्यावर आधारलेली ही राजवट होती असे म्हटले जाते. महसूलातील थकबाकी फेडण्यासाठी अनेकदा गुन्हेगारांच्या कुटुंबाची विक्री केली जात.

खरोखर गढवालमध्ये गुरख्यांच्या वर्तनास 'गुरखानी' असे नाव पडले होते. याचे कारण म्हणजे, लहरी सैनिक रात्रीच्या वेळी गावातील सर्व दूध पिऊन टाकत आणि पुन्हा सकाळच्या वेळी येऊन दह्याची मागणी करत.

गुरखा युद्ध सुरु होण्याचे त्वरित कारण म्हणजे प्रदेशातील वादग्रस्त विभागातील पोलिस स्थानकाची हानी. याची सुरुवात झाली ती तेथील प्रभारी निरीक्षकाच्या ह्त्येने. त्यांनी अत्यंत पराक्रमी रीतीने संरक्षण केले. मात्र, या संघर्षात त्यांच्या 18 कॉन्स्टेबल्सचा मृत्यू झाला आणि 8 कॉन्स्टेबल जखमी झाले. त्यानंतर काही दिवसांमध्येच दुसऱ्या पोलिस स्टेशनवर हल्ला करण्यात आला. दंडात्मक कारवाईसाठी अनुकूल काळ नसल्याने नेपाळच्या राजास आक्रमक निषेध नोंदविणारे पत्र पाठविण्यात आले. मात्र, यावर राजाने उन्मत्त प्रतिसाद दिला. 1 नोव्हेंबर, 1814 रोजी युद्धाची घोषणा झाली. या कारवायांचा उल्लेख 'विल्यम्स मेमॉईर ऑफ दि डून' या पुस्तकात आढळून येईल. लष्करी बळाच्या बाबतीत गुरखा शत्रूच्या तोडीस तोड होते. नालापानी डोंगरावर घाईघाईने बांधण्यात आलेल्या किल्ल्यातून लढणारे, ज्याला कलिंगा असेही म्हटले जाते, लढणारे मूठभर वीर होते; ज्यांची इतिहासात झालेली नोंद निग्रही आणि शूर अशी आहे.

डून खोऱ्यात रिस्पना नदीच्या काठावरील दोन दगडी स्तंभ विजय आणि पराजय अशा दोन्ही गोष्टींच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहेत. एक स्तंभ जनरल जिलेप्सी आणि त्यांच्याबरोबर मृत्यूमुखी झालेले लोक आणि दुसरा स्तंभ शूरवीर बलबहाद्दर सिंह आणि धाडसी गुरख्यांच्या स्मरणार्थ आहे. मात्र, 17 नोव्हेंबर, 1815 रोजी सहारनपूर जिल्हा हस्तगत करण्यात आला.

1815 साली ब्रिटीश जनरल ऑश्टेरलॉनी यांनी नेपाळींना काली नदीच्या काठावर असलेल्या गढवाल आणि कुमाऊ येथून बाहेर काढले. परिणामी, त्यांची 12 वर्षांची राजवट नष्ट झाली. हा काळ उत्तराखंडच्या इतिहासातील सर्वाधिक क्रूर आणि दमनकारी काळ म्हणून लक्षात ठेवला जाईल. पुर्वेकडे सिक्कीमधील तीस्ता ते पश्चिमेकडील सतलज नदीदरम्यान असणाऱ्या भूमीवर नेपाळ्यांचा ताबा होता.

सर्वसाधारण स्तरावरील तह करण्यासाठी वाटाघाटी करण्यात आल्या आणि यातून एक करार करण्यात आला. बिहारमधील चंपारण्यातील सगौली येथे 1816 रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर 1816 साली कराराची अंमलबजावणी करण्यात आली. या मोबदल्यात, नेपाळने आपण मिळवलेली पुर्वेकडील तसेच पश्चिमेकडील सर्व भूमी देऊन टाकली. यामध्ये संपुर्ण तराई भाग ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकण्यात आला. यामुळे नेपाळची सीमा तयार झाली. यावर 2 डिसेंबर 1815 रोजी स्वाक्षरी झाली आणि 4 मार्च 1816 रोजी ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळच्या वतीने राज गुरु गजराज मिश्रा तसेच चंद्र शेखर उपाध्याय यांच्याकडून त्यास मंजुरी देण्यात आली. हा करार नेपाळने ब्रिटीशांपुढे घेतलेल्या शरणागतीचे प्रतिनिधित्व करतो आणि याअंतर्गत नेपाळच्या पश्चिम भुभागाचे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीस देण्यात आले.

नेपाळला आपल्या पुर्वीच्या सीमांपर्यंत पाठवून देत सिक्कीम, तराई, कुमाऊं आणि गढवाल हा भाग पुन्हा ब्रिटीशांकडे आला. उत्तराखंडमधील पित्तोरगढ जिल्ह्यातील सारदा नदी(जिला नेपाळमध्ये महाकाली म्हटले जाते) ही दोन्ही देशांमधील सीमा निश्चित करण्यात आली. अर्थात् पुर्वेकडे जुनी सीमा बिहारमधील किशनगंज येथे विस्तारणारी मेची नदी होय.

सध्या अस्तित्वात असलेल्या वादाचे मूळ हे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने बांधलेल्या रस्त्यात दडलेले आहे. लिपूलेख पासद्वारे मानसरोवर यात्रेस जाणारे अंतर कमी करण्यासाठी हा रस्ता बांधण्यात आला आहे. महाकाली नदीच्या तीन उपनद्या आहेतः उत्तराखंडमधील पित्तोरगढ जिल्ह्यातील लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपूलेख.

पश्चिम भागात लिम्पियाधुरा ही सीमा आहे असा नेपाळींचा दावा आहे. मात्र, ही सीमा लिपूलेख असल्याचे आपले म्हणणे आहे. नेपाळमधील कम्युनिस्ट सरकारने या वादास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आहे. यासाठी देशाला चीनचे समर्थन लाभले आहे. कारण, चीनचा या हिमालयीन राष्ट्रातील वाढता प्रभाव.

जेव्हा हत्ती लढू लागतात, पृथ्वीला हादरा बसतो आणि गवत पायदळी तुडवले जाते. जेव्हा काही दिवसांपुर्वी ताज्या वादासंदर्भातील बातमी समोर आली, तेव्हा मला या म्हणीचा अर्थ गवसला. आपल्याकडील पहाडी भागात कार्यरत असणारा प्रत्येक नेपाळी पुर्णपणे नाहीसा झाला. त्यांना घरी जावे लागले.

(डोंगरदऱ्यांमध्ये जन्माला आलेले आणि तेथे वाढलेले लेखक गणेश शैली यांचा समावेश अशा काही निवडक लोकांमध्ये होतो ज्यांचे शब्द हे त्यांच्या चित्रातून स्पष्ट होतात. यांच्या नावावर दोन डझनहून अधिक पुस्तके असून सुमारे 20 भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद करण्यात आला आहे. त्यांच्या लिखाणास जगभर मान्यता मिळाली आहे.)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.