ETV Bharat / opinion

नंदीग्रामचे उत्सुकतावर्धक प्रकरण: रॉयल बंगालचे युद्धच

दीपंकर बोस, वृत्त समन्वयक, ईटीव्ही भारत

नंदीग्रामचे उत्सुकतावर्धक प्रकरण: रॉयल बंगालचे युद्धच
नंदीग्रामचे उत्सुकतावर्धक प्रकरण: रॉयल बंगालचे युद्धच
author img

By

Published : Mar 30, 2021, 9:15 PM IST

सुरुवातीला दोन ऑडिओ टेप आल्या. त्यातील एकामध्ये, या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते आणि पक्षाचे उमेदवार मुकुल रॉय हे मतदानादरम्यान बूथ एजंट तैनात करण्याबाबतचे नियम बदलण्याबाबत निवडणूक आयोगाकडे संपर्क साधण्याविषयी पक्षाच्या दुसर्‍या कार्यकर्त्याशी संभाषण करीत होते.

दुसर्‍यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत आणि निवडणुकीत आपल्या पक्षाला मदत करण्याचे आवाहन त्या करतात.

जरी दोन्ही ऑडिओ क्लिपची सत्यता कधीही पुढे आली नाही, तरीही त्यांचा गाजावाजा झालाच. आणि मग बॉम्बगोळाच पडला.

ममता बॅनर्जी यांनी २८ मार्च रोजी नंदीग्रामच्या रेपारा भागात झालेल्या सभेत संबोधित करताना आरोप केला की, सीसीर अधिकारी व सुवेंदू अधिकारी ही पिता-पुत्र जोडी १४ मार्च २००७ च्या नंदीग्राम हत्येमागील सूत्रधार आहे. नंदीग्राम येथे पोलिस नाकाबंदी करण्यास जात असताना 14 लोक ठार झाले. इंडोनेशियन समूह सलीमने विकसित केलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (पेट्रोलियम, रसायने व पेट्रोकेमिकल्स इन्व्हेस्टमेंट रीजन) जागेचे अधिग्रहण रोखण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता.

“कदाचित आपणा सर्वांना आठवत असेल की असे काही लोक होते ज्यांनी चप्पल घातल्या होत्या आणि त्यांनी गोळीबार केला होता. त्यांनी हवाई चप्पल घातल्या होत्या. पुन्हा ते गोंधळ घालत आहेत. माझं याच्या खरेपणाबद्दल कुणालाही आव्हान आहे की, बाप-मुलाच्या जोडीच्या परवानगीशिवाय पोलिस त्या दिवशी नंदीग्राममध्ये दाखल झाले नसते." ममता आपल्या एकेकाळी जवळचे विश्वासू असणाऱ्या सीसिर आणि जवळचे सहकारी सुवेंदू यांच्याबद्दल असे बोलल्या.

ममतांच्या या शब्दांमधून जणू काय बाँबच पडला. यानंतर सोशल मीडियावर पोस्टचा पूर आला आणि माध्यमेही एका मेसेजने बुचकळ्यात पडली. – बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या धुतलेल्या कडक धोतीवरील रक्ताचे डाग शेवटी धुतले गेले ते दुसऱ्या कुणी नाही तर त्यांचा पूर्णपणे द्वेष करणाऱ्या ममता बॅनर्जींनी.

पण, 14 वर्षानंतर अचानक ममतांनी हे जाहीरपणे का सांगितले? चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या राजकीय कारकीर्दीत त्यांना आता सामना करावा लागत असलेल्या सर्वात महत्त्वाच्या निवडणुकांपैकी एक असलेल्या या निवडणुकीला केवळ चार दिवस बाकी असताना असे विधान करण्यास कसे प्रवृत्त केले? अशा प्रकारे सीपीआय(एम)ला की ज्यांच्याबरोबर त्या निकराने लढल्या, त्यांनाच एकप्रकारे कोरा चेक देण्याचेच काम करण्यासाठी त्यांनी नंदीग्रामचीच का बरे निवड केली? हेच ते नंदीग्राम, ज्यामध्ये २००७ साली बंगालसाठी त्यांना मार्ग मोकळा करुन दिला? आता या प्रश्नांची उत्तरे नंदिग्राममध्ये भिरभिरत आहेत.

पूर्व मिदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा मतदार संघ हा नेहमीच डाव्यांचा गड राहिला आहे. या मतदारसंघात नांदीग्राम ब्लॉक १ आणि २ चा समावेश आहे, तसेच यामध्ये दोन पंचायत समित्या आणि १७ ग्रामपंचायती आहेत. नंदीग्रामवर शेजारील हल्दियाच्या औद्योगिक भागाचं प्रतिबिंबित दिसतं आणि हुगळी नदी तसेच बंगालच्या उपसागराच्या जवळच हा भाग आहे. नंदीग्राममध्ये सुमारे साडेतीन लाख लोक आहेत. त्यातील सुमारे २ लाख ७० हजार मतदार आहेत. त्यामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम मतदारांची संख्यादेखील जवळजवळ २७ टक्के आहे. आणि इथेच विजयाची किल्ली आहे.

तृणमूलच्या निवडणूक तज्ज्ञांची नंदीग्राम ब्लॉक-१ मधील अल्पसंख्याक मतदारांवर मदार आहे. त्यांना आशा आहे की या ब्लॉकमधील मतदार ममतांच्या बाजूने झुकतील आणि त्यांना आरामशीर आघाडी मिळेल. दुसरीकडे ममतांना निर्णायक लढा देण्यासाठी भाजपा किंवा थोडक्यात सांगायचे झाले तर हा भाग ज्यांना माहीत आहे ते सुवेंदु अधिकारी आघाडी मिळवण्यासाठी नंदिग्राम ब्लॉक -२ वर अवलंबून आहेत. म्हणूनच या भागातील बहुसंख्य हिंदू मतदारांना साद घालण्यात सुवेंदू कोणतीही कसर सोडत नाही. गंगासागर जवळ असल्याने नंदीग्राममध्ये नेहमीच वैष्णवांची मांदियाळी आणि नेहमीच गावोगावी कीर्तन होतच राहतात. सुवेंदू यांना त्याचेच पडसाद ईव्हीएममधून पाहायचे आहेत. त्याच अनुषंगाने 70-30 च्या सूत्रातून मतांचे ध्रुवीकरण करण्याचे काम आधीच त्यांनी सुरू केलेले आहे.

या सर्वामध्ये डाव्यांच्या मतांचा कौल कुणाला, यात निवडणुकीचे इंगित लपले आहे. जेव्हा २०११ मध्ये ममतांनी डाव्या आघाडीवर मात केली होती, त्यावेळीही डाव्यांना जवळपास ६०००० मते मिळाली होती. 2016 मध्ये ममतांनी डाव्यांना पुन्हा एकदा धूळ चारली, त्यावेळीही त्यांना जवळपास 53,००० मते मिळाली. शेवटी, जेव्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डाव्यांच्या मतांची पातळी अत्यंत खालच्या स्थरावर आला होता, तरीही तामलुकच्या जागेवरुन त्यांना १ लाख ४० हजार मते मिळाली होती, नंदीग्राम हा त्याच मतदारसंघाचा एक भाग आहे.

त्यामुळे नंदीग्रामच्या विजयाचे गणित आता नंदीग्रामच्या माकपच्या उमेदवार मिनाक्षी मुखर्जी यांच्यावर अवलंबून असेल, जे ममता आणि सुवेंदू यांच्यातील लढतीतील निर्णायक ठरु शकेल. म्हणूनच ममतांनी अलिकडेच डाव्यांना चुचकारले आहे. त्यांना डाव्यांची भाजपच्या वळचणीला जाणारी मते रोखायची आहेत. डाव्यांना क्लिन चिट दिल्याने त्याचानंदीग्राममध्ये फायदा होईल असे ममतांना वाटते.

दुसरीकडे सुवेंदूंचा सामना ममता बॅनर्जी यांच्याशी आहे, त्या काही लक्ष्मण सेठ नाहीत, जे माकपचे तत्कालीन नेते आणि तमलकचे खासदार होते. अचानक हालचालींतून, एखाद्या सामान्य घटनेला वेगळे वळण देण्याची क्षमता असल्याची ममतांची ख्याती आहे. म्हणूनच त्या विरोधक सुवेंदू अधिकारी यांच्यासाठी एक नाणावलेल्या विरोधक म्हणता येतील.

डाव्यांना क्लिन चिट देऊन एक प्रकारे ममतांनी डाव्यांना प्रेमाचा हात दिला आहे.? काही गडबड झाली तर त्या डाव्यांकडून बाहेरून पाठिंब्याची अपेक्षा तर ठेवत नाहीत ना? विरोधकांना मुर्ख बनवून ममता त्यांची जादू साधून घेतील का? म्हणूनच नंदीग्रामच्या निवडणुकीचे प्रकरण उत्सुकतावर्धक आहे.

नंदीग्रामच्या जागेसाठी १ एप्रिल रोजी मतदान आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.