नवी दिल्ली - फोटोग्राफीची आवड असलेल्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन रिअलमीने खास स्मार्टफोन बाजारपेठेत आणले आहेत. स्मार्टफोन ब्रँड रिअलमीने 8 प्रोमध्ये दोन मध्यम श्रेणीतील मॉडेल लाँच केले आहेत. यामध्ये 108 मेगापिक्सेलचा अल्ट्रा क्वाड कॅमेरा आहे.
रिअलमी 8 प्रो हे दोन श्रेणीमध्ये आहेत. यामध्ये 17,999 (6 जीबी+128 जीबी) आणि 19,999 (8 जीबी + 128 जीबी) या दोन मॉडेल प्रकारांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन आज लाँच झाले आहेत.
हेही वाचा-कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धसका ; शेअर बाजारात ९०० अंशांची पडझड
6.4 इंच स्मार्टफोन रिअलमी 8 मध्ये 64 मेगापिक्सेल एआय क्वाड कॅमेरा आहे. हे डिव्हाईस 14,999 किंमतीत (4 जीबी+128 जीबी), 15,999 किंमतीत (6 जीबी+128 जीबी) आणि 16,999 किमतीमध्ये (8 जीबी+128 जीबी) या तीन श्रेणीमध्ये स्मार्टफोन उपलब्ध आहेत. रिअलमीचे भारतीय उपाध्यक्ष आणि सीईओ माधव सेठ म्हणाले की, आम्ही ग्राहकांच्या संख्येत यशस्वीरित्या 3 कोटींचा आकडा गाठला आहे. आमच्या वापरकर्त्यांना रिअलमी 8 ची ही श्रेणीदेखील आवडेल, यात संशय नाही.
हेही वाचा- व्हॉट्सअपला धक्का! गोपनीयतेच्या धोरणाचा सीसीआय करणार सखोल तपास
- क्वालकोमन् स्नॅपड्रॅगन 720 जी, रिअलमी 8 प्रोमध्ये सुपर एएमओएलईडी फुलस्क्रीन आणि अल्ट्रा फास्ट फिंगरप्रिंट स्कॅनर, 50 डब्ल्यू सुपरडार्ट चार्ज आणि रिअलमी यूआय 2.0 आहे.
- रिअलमी 8 मध्ये 5000 एमएएचची दणकट बॅटरी आहे.
- मीडियाटेक हेलिओ जी 95 गेमिंग प्रोसेसरची स्मार्टफोनला सामर्थ्य मिळाले आहे. 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
- 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. त्यामधून स्टॅरी टाईम लॅप्स पद्धतीचे आणि टिल्ट शिफ्ट टाईम लॅप्सचे व्हिडिओ काढणे शक्य होते.
- यामध्ये 3 एक्स सेन्सर झुम आहेत. तसेच टिल्ट शिफ्ट फोटोग्राफी मोड, न्यू स्टॅरी मोड आणि नवीन पोट्रेट मोड आहे.
- डिव्हाईसमध्ये 16 मेगा पिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. 4,500 एमएएचची दणकट बॅटरी आहे. 47 मिनिटात बॅटरी 100 टक्के चार्ज होते.
- वजन मापनासाठी कंपनीने स्मार्ट स्केल लाँच केली आहे. ही स्मार्ट स्केल 1,999 रुपयांना 30 मार्चपासून उपलब्ध होणार आहे.
- कंपनीने स्मार्ट बल्ब लाँच केला आहे. 9 वॅटचा बल्ब 799 तर तर 12 वॅटचा स्मार्टफोन हा 999 रुपयांना उपलब्ध आहे.
- कंपनीच्या रिअल अपग्रेड प्रोग्रॅममधून रिअलमी 8 प्रो (6GB+128GB) हा 12,599 आणि रिअलमी 8 प्रो (8GB+128GB) 13,99 रुपयांना उपलब्ध आहे.