पणजी - हॅकरकडून फेसबुक व ट्विटर अकाउंट हॅक होणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, हॅकरने थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले. त्यानंतर धक्कादायक प्रकार घडला आहे.
प्रमोद सावंत यांनी फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची पोलिसात तक्रार दिली आहे. हॅकरने मुख्यमंत्र्यांच्या अकाउंटवरून प्रमेश असोलकर यांच्याकडे 30 हजार रुपये मागितले. हे पैसे दोन तासामध्ये परत देऊ असेही हॅकरने सांगितले. असोलकर यांनी सांगितले, की गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता मला प्रमोद सावंत यांच्या अकाउंटवरून फ्रेड रिक्वेस्ट मिळाली. प्रोफाईलमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि भाजपचे कमळ चिन्ह होते. त्यामुळे हे अकाउंट खरे असल्याची खात्री पटली. पण, जेव्हा पैसे मागितले, तेव्हा काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आले.
हेही वाचा-भाजपला घाबरणाऱ्यांना पक्षाबाहेर हाकला, आपल्याला निडर लोक हवेत - राहुल गांधी
असोलकर म्हणाले, की लोकांना सोशल मीडिया अकाउंट वापरताना सावध राहणे गरजेचे आहे. विशेषत: जेव्हा मुख्यमंत्र्यांचे फेसबुक अकाउंट हॅक होत असल्याचे घडत असते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची पुष्टी दिली. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. पोलिसात तक्रार दिली आहे.
हेही वाचा-रिलायन्सचा जस्ट डायलला सर्वात मोठा कॉल, 3,497 कोटी रुपयांची केली गुंतवणूक
भाजपा नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांचे फेसबुक खाते झाले होते हॅक
केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या काही तासांनी भाजपा नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांचे फेसबुक खाते हॅक झाले होते. केंद्रीय मंत्र्यांच्या फेसबुक पेजवर हॅकर्सनी एक जुना व्हिडिओही पोस्ट केला. त्यामध्ये सिंधिया काँग्रेस पक्षाचे कौतुक करताना दिसत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. फेसबूक पोस्ट व्हायरल होताच सिंधिया यांच्या आयटी टीमने ताबडतोब खाते रिकव्हर केले. अद्याप, ज्योतीरादित्य सिंधिया यांचे खाते कोणी हॅक केले याची माहिती समोर आलेली नाही.