हाँगकाँग : जागतीक आरोग्य संघटना आणि सर्वोच्च जागतिक नेत्यांनी कोविडबद्दल अचूक डेटा मिळवण्यास सांगितले. चीनच्या महामारी तज्ञांनी सांगितले की कोविड19 डेटा तयार करण्यास वेळ लागतो. चीन देश जगासोबत अचूक डेटा शेअर करतो. चीनने डब्ल्यूएचओसोबत अनेक तांत्रिक बाबींची देवाणघेवाण केली आहे.
साथीच्या रोगाचा सामना करणे : नॅशनल हेल्थ कमिशन अंतर्गत चीनचे कोविड-19 प्रतिसाद तज्ञ पॅनेलचे प्रमुख लियांग वानयान म्हणाले की, चीनमधील कोविड 19 मृत्यूबाबत जगाला काही पडले नाही. त्याऐवजी जागतिक पातळीवर कोविड साथीचा सामना कसा करावा लागेल याकडे जगाचे प्राधान्याने लक्ष आहे. चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे मुख्य महामारी शास्त्रज्ञ वू जुनाओ यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, 2020मध्ये साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, केंद्राने मृत्यू दराचे विश्लेषण सुरू ठेवले आणि ते कशामुळे झाले याचे अहवाल जाहीर केला.
मृत्यूंच्या संख्येसाठी झगडत आहे : चिनी सीडीसीच्या जवळच्या तज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, चीन नेहमीच कोविड19 परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. त्यामध्ये कोविडने होणारे मृत्यू आणि नवीन व्हेरिअंटचा यांचा समावेश आहे. चीनही रुग्णालयांच्या बाहेरच्या कोरोना संबंधित मृत्यूंच्या विळख्यात अडकला आहे. मात्र कमी प्रमाणात होणाऱ्या चाचण्या तसेच त्याचे खूप वेळाने मिळणारे अहवाल यामुळे रुग्णालयांतून जमा केलेल्या माहिती संकलनामध्ये तुलनेने जास्त वेळ लागत आहे, असे तज्ञांनी स्पष्ट केले.
कोविडमुळे सुमारे 60,000 लोकांचा मृत्यू : एनएचसी अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान हॉस्पिटलमध्ये एकूण 59,938 कोविड संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी कोविडमुळे सुमारे 60,000 लोकांचा मृत्यू झाल्याचे चिनी सरकारच्या मान्यतेने जाहीर केले. डब्ल्यूएचओ प्रमुखांनी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे संचालक मंत्री मा झियाओवेई यांच्याशी देशातील कोविड19 परिस्थितीबद्दल चर्चा केली.
कोरोना जागतिक आरोग्य आणीबाणी नाही : टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की आम्हाला आशा आहे की, पुढच्या महिन्यात आम्ही असे म्हणू शकू की कोविड-19 ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही. कोविड 19 साथीच्या रोगासाठी जबाबदार SARS COV-2 विषाणू कधीही संपणार नाही. सर्व देशांनी इन्फ्लूएन्झा आणि आरएसव्ही सहइतर श्वसन रोगांसह त्यावर नियंत्रण मिळवणे शिकले पाहिजे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस यांनी म्हटले की, साथीच्या रोगाचा सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की सर्व देशांनी साथीच्या रोगांचा सामना करण्याची तयारी, प्रतिबंध, शोध आणि जलद प्रतिसाद देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Coronavirus Disease कोरोनाची वाढती संख्या पाहता पुन्हा चौथा डोस देण्याची गरज