ETV Bharat / international

Turkey Earthquake : भूकंपातील मृतांची संख्या 20 हजारांच्या पुढे, तुर्कीत तीन महिन्यांची आणीबाणी लागू - तुर्कीत तीन महिन्यांची आणीबाणी

तुर्की आणि सीरियात सोमवारी आलेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांचा आकडा सातत्याने वाढतो आहे. आज मृतांचा आकडा 20 हजारांच्या पुढे गेला आहे. भारतासह जगातील अनेक देश भूकंपग्रस्तांना मदत करत आहेत.

Turkey Earthquake
तुर्की भूकंप
author img

By

Published : Feb 10, 2023, 8:36 AM IST

Updated : Feb 10, 2023, 9:05 AM IST

अंकारा/दमास्कस : तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारताची एनडीआरएफ टीम आणि लष्करही यामध्ये सहभागी झाले आहे. एनडीआरएफच्या टीमने आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

तीन महिन्यांची आणीबाणी जाहीर : तुर्की आणि सीरियामधील भूकंपामध्ये मृतांची संख्या 20,783 वर पोहोचली आहे. तर एकूण जखमींची संख्या 75592 झाली आहे. तुर्कीमध्ये मृतांची संख्या किमान 17,406 वर पोहोचली आहे. तर एकूण 70,347 लोक जखमी झाले आहेत. तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी ही माहिती दिली आहे. सीरियातील एकूण जखमींची संख्या 5,245 असून सरकार-नियंत्रित भागात 2,295 आणि बंडखोरांच्या ताब्यातील भागात 2,950 जखमी आहेत. तुर्कीच्या भूकंपग्रस्त प्रांतांमध्ये बचाव आणि मदतीच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी संसद सदस्यांनी गुरूवारी तीन महिन्यांची आणीबाणी मंजूर केली आहे.

१० प्रांतात जाणवले धक्के : कहरामनमारस प्रांतात केंद्रस्थान असलेल्या या भूकंपाचे धक्के १० प्रांतातील १२ दशलक्षाहून अधिक लोकांना जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.७ आणि ७.६ इतकी नोंदवल्या गेली आहे. तुर्कीतील अडाना, अदियामान, दियारबाकीर, गॅझियानटेप, हाताय, किलिस, मालत्या, उस्मानिया आणि सॅनलिउर्फा या प्रांतासह सीरिया आणि लेबनॉन व तुर्कीच्या शेजारी देशांनाही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

तुर्कीला जगभरातून मदत : सोमवारच्या आपत्तीनंतर तुर्कीला जागभरातून मदत मिळते आहे. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुत कावुसोग्लू यांनी गुरुवारी सांगितले की, भूकंपानंतर 75 देश आणि 16 आंतरराष्ट्रीय संस्थांनी तुर्कीला मदत करण्याचे वचन दिले आहे. ते म्हणाले की, 56 देशांतील 6,479 बचावकर्ते बचाव कार्यात गुंतले आहेत. तसेच आणखी 19 देशांचे संघ 24 तासांत येथे पोहचतील. या आपत्तीत आतापर्यंत तुर्की आणि शेजारील सीरियामध्ये 20,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 70,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर सुरू असलेल्या बचाव कार्यात भारत तुर्कीला मदत करत आहे. भारतीय लष्कराने आपत्ती निवारण पथके तैनात केली आहेत आणि देशातील नुकत्याच झालेल्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी फील्ड हॉस्पिटलची स्थापना केली आहे.

दशकातील सर्वात प्राणघातक भूकंप : सोमवारी आलेला भूकंप हा 1939 पासून तुर्कीत आलेला सर्वात शक्तिशाली भूकंप होता. 7.8-रिश्टर स्केलचा हा विनाशकारी भूकंप या दशकातील सर्वात प्राणघातक भूकंप ठरण्याची शक्यता आहे. तुर्की जगातील सर्वात सक्रिय भूकंप झोनपैकी एक आहे. 1999 मध्ये, उत्तर तुर्कीच्या डुझेच्या प्रदेशात उत्तर अनाटोलियन फॉल्ट लाइनवर झालेल्या भूकंपात 17,000 हून अधिक लोक मारले गेले होते. तुर्कीत शेवटचा मोठा भूकंप होऊन बराच काळ लोटला होता.

हेही वाचा : Chinese Spy Balloons targeted India: चीनची घुसखोरी.. भारताच्या हद्दीत 'स्पाय बलून' पाठवून गोळा केली सैन्याची गोपनीय माहिती

Last Updated : Feb 10, 2023, 9:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.