दमास्कस - यूकेच्या एका युद्ध मॉनिटरच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने सन 2020 मध्ये सिरियन लष्करी तळांवर एकूण 39 हल्ले केले आहेत. बुधवारी इस्रायलने गेल्या वर्षातील शेवटचा हल्ला केला.
या हल्ल्यांमध्ये 217 सीरियन सैनिक आणि इराण समर्थक सशस्त्र लोक ठार झाले आहेत, असे सीरियासाठी मानवाधिकारांसाठी देखरेख आणि काम करणाऱ्या एजन्सीचा हवाला देत शनिवारी सिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
हेही वाचा - इस्रायलची गुप्तहेर संस्था मोस्साद.. सध्या का आहे चर्चेत?
बुधवारी, इस्त्रायली क्षेपणास्त्रांनी दमास्कसच्या पश्चिमेस जाबदानी उपनगरातील सैन्य तळाला लक्ष्य केले. त्यात एक सैनिक ठार आणि 3 जण जखमी झाले. हा इस्रायलने गेल्या वर्षात सीरियावर केलेला शेवटचा हल्ला केला.
इराण समर्थक शस्त्र डेपोला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
हेही वाचा - बैरूत : नवीन वर्षाच्या उत्सवांतील गोळीबारांमुळे तीन विमानांना लागल्या गोळ्या