तेहरान - इराण आणि सीरिया यांनी द्विपक्षीय व्यापार सहकार्यासाठी एकत्रित बँक स्थापना करण्याची योजना आखली आहे. ही माहिती एका उच्च अधिकाऱ्याने दिली.
'आम्ही इराण आणि सिरियाच्या मध्यवर्ती बँकांमध्ये अंतर्गत स्विफ्ट (यंत्रणा) निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत,' असे इराण, इराक आणि सीरियाच्या आर्थिक विकास मुख्यालयाचे ज्येष्ठ सदस्य गोल मोहम्मदी यांनी शनिवारी म्हटले. याचे वृत्त सिन्हुआने दिले आहे.
हेही वाचा - इराणमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे 6 गिर्यारोहक ठार
मोहम्मदी म्हणाले की, ही योजना अंतिम टप्प्यात आहे, ज्यामुळे इराण आणि सीरिया यांच्यातील पैशांच्या हस्तांतरणाच्या समस्या सुटतील.
तत्पूर्वी, सेंट्रल बँक ऑफ इराणचे गव्हर्नर, अब्दोल्नासेर हेम्मती यांनी सीरियाने त्यांच्या बाजूने यासंदर्भातील अडथळे दूर करण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त बँक आर्थिक सहकार्याला चालना देण्यास मदत करेल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - सीरियात मध्यरात्री झालेल्या इस्रायली हल्ल्यात 6 सैनिक ठार