रियाध - सौदी अरेबियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बावजा हे सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्यासाठी गेले. मात्र, पाकिस्तानवर संतप्त असलेल्या सौदी अरेबियाच्या राजांची बावजा यांना भेट मिळू शकली नाही.
जनरल कमर जावेद बावजा हे पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे प्रमुख आहेत. ते व जनरल फैयाज हमीद हे सोमवारी सौदी अरेबियात पोहोचले होते. सौदी अरेबियामध्ये तणावाची स्थिती असताना ही भेट पाकिस्तानसाठी महत्त्वपूर्ण मानली जात होती.
बाजवा यांना सौदी अरेबियाचे उप संरक्षण मंत्री राजपुत्र खलीद बिन सलमान आणि सौदी अरेबियाच्या लष्कराचे प्रमुख जनल फय्याद बिन हमीद-अल-रुवैली यांची भेट मिळू शकली. मात्र, त्यांना सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांची भेट मिळविण्यात अपयश आले.
आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानवर कर्जाची टांगती तलवार
पाकिस्तानकडून सौदी अरेबियाला 3.2 टक्के व्याज देण्यात येत आहे. पाकिस्तानला सौदीचे 2 अब्ज डॉलरचे कर्ज फेडावे लागणार आहे. सौदी अरेबियाने कर्ज फेडण्याची सूचना केल्यानंतर पाकिस्तानने चीन व लंडन इंटरबँक ऑफर्ड रेटकडून कर्ज घेतले आहे.
सौदी अरेबियाबरोबर संबंध बिघडणे पाकिस्तानला महागात पडणार आहे. अशातच पाकिस्तानच्या सैन्यदलाकडून दोन्ही देशांमध्ये संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, पाकिस्तानच्या वागणुकीमुळे सौदी अरेबियाचे राजघराणे नाराज झाले आहे. पाकिस्तान हे तुर्की, इराणच्या दिशेने झुकले आहे. तसेच पाकिस्तान चीनबरोबर आर्थिक आणि रणनीतीचे संबंध वाढवित असल्याने सौदी अरेबिया पाककडे दुर्लक्ष करत आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरैशी यांच्या इशाऱ्यानंतर बिघडले संबंध
सौदी अरेबियाने इस्लामिक संघटना असलेल्या आयओसीमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताविरोधात प्रश्न उपस्थित करावा, अशी पाकिस्तानकडून वारंवार मागणी करण्यात येत आहे. याबाबत नुकतेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी सौदी अरेबियाला इशारा दिला होता. त्यानंतर सौदी अरेबियाकडून 1 अब्ज डॉलरचे कर्ज वसूल केले. तसेच खनिज तेलाचा पुरवठाही थांबविला आहे.