ETV Bharat / international

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इसिसचे ८ दहशतवादी ठार - अमेरीकी फौजा बातमी

इराकमध्ये अमेरिकेच्या संयुक्त फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इस्लामिक दहशतवादी (आयएस) संघटनेचे ८ जण ठार झाले आहेत. इराकच्या मध्य भागातील सलाउद्दीन प्रांतामध्ये शनिवारी ही कारवाई करण्यात आली.

अमेरिकेची कारवाई
author img

By

Published : Sep 29, 2019, 9:36 AM IST

बगदाद - इराकमध्ये अमेरिकेच्या संयुक्त फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इस्लामिक दहशतवादी (आयएस) संघटनेचे ८ जण ठार झाले आहेत. इराकच्या मध्य भागातील सलाउद्दीन प्रांतामध्ये शनिवारी ही कारवाई करण्यात आली. वाळवंटामध्ये लपून बसेलल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तसेच दहशतवाद्यांचे चार तळही उध्वस्त करण्यात आले आहेत.

दहशतवादी लपून बसल्याची लष्कराला गुप्त माहिती मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सलाउद्दीन ऑपरेशन कमांडने या कारवाईत सहभाग घेतला होता. हवाई दलाने दहशतवाद्यांच्या तळावर बॉम्बचा वर्षाव केला. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे शस्त्रसाठा ठेवण्याचा तळही उध्वस्त करण्यात आले.

2017 साली दहशतवाद्यांचा नायनाट करण्यात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं होतं. त्यामुळे इराकमध्ये सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाली आहे. मात्र, दहशतवादानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांवर पुन्हा हल्ले होण्यास सुरुवात झाली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.