दमास्कस - पूर्व सीरियात एका प्रवासी बसवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात 25 जण ठार झाले. या हल्ल्यात इतर 13 जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली.
कबाजेब प्रदेशातील पाल्मीरा-दैर-अल-झौर रस्त्यावरील सैनिकांच्या बसला लक्ष्य करून बुधवारी हा दहशतवादी हल्ला करण्यात आला, असे वृत्तसंस्था सिन्हुआने स्थानिक माध्यमांच्या वृत्ताच्या हवाल्याने म्हटले आहे.
हेही वाचा - इराण, सीरिया व्यापार वाढविण्यासाठी संयुक्त बँक स्थापन करणार
हल्ल्याच्या घटनेला दुजोरा पुष्टी देताना यूकेस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राईटस संस्थेने म्हटले आहे की, इस्लामिक स्टेट (आयएस) च्या दहशतवादी गटाने दैर-अल-झौर प्रांतात रस्त्यावर सैनिकांना घेऊन जाणाऱ्या सैन्याच्या तीन बसेसना लक्ष्य केले.
सीरियामधील महत्त्वपूर्ण भाग गमावल्यामुळे, आयएसचे दहशतवादी पूर्वेकडील सीरियाच्या वाळवंटात स्थलांतरित झाले आहेत. तेथे बहुधा ते सैन्य दलाच्या जवानांवर आणि त्यांच्या तळांना लक्ष्य बनवून त्यांच्यावर हल्ले करतात.
हेही वाचा - पाकिस्तानमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात 2 ठार, 8 जखमी