ETV Bharat / international

बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द!

author img

By

Published : Jan 5, 2021, 5:49 PM IST

यापूर्वी १५ डिसेंबरला जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींचे आमंत्रण स्वीकारत, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर आपण या कार्यक्रमासाठी उत्सुक असल्याचेही जॉन्सन यांनी सांगितले होते. मात्र, आता भारत दौरा रद्द झाल्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही.

United Kingdom PM Boris Johnson cancels visit to India later this month
बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द!

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचा भारत दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती ब्रिटन सरकारने दिली आहे.

दुसरे ब्रिटीश पंतप्रधान..

भारत स्वतंत्र झाल्यानंतर जॉन्सन हे ब्रिटनचे दुसरे असे पंतप्रधान होते ज्यांना दिल्लीमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मान मिळाला. यापूर्वी १९९३मध्य ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान जॉन मेजर यांना हा मान मिळाला होता.

भारत-ब्रिटन संबंधांच्या नव्या युगाची सुरुवात..

जॉन्सन यांनी प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारल्यानंर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते, की भारत-ब्रिटन संबंधांसाठी एका नव्या युगाची सुरुवात झाल्याचे हे प्रतीक असेल.

ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन..

नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. नवा विषाणू जास्त संसर्गजन्य असल्याने ब्रिटनमध्ये मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे.

हेही वाचा : पुढील आठवड्यात होऊ शकते कोरोना लसीकरणाला सुरुवात; आरोग्य सचिवांचे संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.