लंडन - जगभरामध्ये कोरोना विषाणू थैमान घालत आहे. युरोपातील इटली, स्पेन आणि जर्मनीनंतर आता इंग्लडमध्येही कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. आज दिवसभरात इंग्लमध्ये 563 जणांचा मृत्यू झाला आहे. देशामध्ये आत्तापर्यंत 29 हजार 474 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
इंग्लडमध्ये 2 हजार 352 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात 2 हजारपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. युरोपातील स्पेन आणि इटलीमध्येही कोरोनाने थैमान घातले असून दोन्ही देशांमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत जगभरामध्ये 44 हजारांपेक्षा जास्त नागिकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात 1 लाख 85 हजार नागरिक पूर्णत: बरे झाले आहेत. जगातील 200पेक्षा जास्त देशांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक देशांनी संचारबंदी लागू केली आहे. व्यापार, पर्यटन, वाहतूक, बाजारपेठा ठप्प झाल्या असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.