कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू असलेल्या वुहान येथील धोका कमी झाला असून धोक्याची पातळी उच्चऐवजी मध्यम स्वरुपाची झाल्याचे सांगत चीनने तब्बल नऊ आठवड्यांच्या लॉकडाऊननंतर या प्रदेशात प्रवास करण्यासंदर्भातील प्रवासी बंधने हटविली आहेत. चीनने आपल्या केंद्रीय हुबेई प्रांतातील 5.6 कोटींहून अधिक लोकसंख्येवर घालण्यात आलेले तीन महिन्यांचे लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नवी प्रकरणे उद्भवतात की नाही याकडे शास्त्रज्ञ आणि जगातील इतर देश जवळून लक्ष देत आहेत. आतापर्यंत ही भीती प्रत्यक्षात आलेली नाही कारण चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या प्रकरणांची संख्या अत्यंत कमी आढळून आली आहे.
"आता लॉकडाऊन शिथिल करण्याची वेळ आली आहे, मात्र संसर्गाची दुसरी संभाव्य लाट येणार नाही यासाठी आपण सतर्क असणे गरजेचे आहे", असे हाँगकाँग विद्यापीठातील रोगपरिस्थितिविज्ञानशास्त्रज्ञ बेन काऊलिंग म्हणाले. ते चीनमधील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीव्र वाढ झाल्यानंतर वुहानमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले. या जीवघेण्या विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी चीनने या प्रदेशाची सीमा ओलांडून येथे प्रवेश करण्यावर बंधने घातली. बहुतांश व्यवसाय, शाळा आणि विद्यापीठे बंद केली आणि लोकांना घरांमध्ये राहण्यास सांगितले. जरी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरीही, पुन्हा पॉझिटिव्ह प्रकरणे उद्भवून नयेत यासाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यात येणार आहेत आणि काँटॅक्ट ट्रेसिंग म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. अर्थात सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले जाणार आहे.
बाहेरुन कोणी विषाणूचा संसर्ग घेऊन येऊ नये, यासाठी चीनने आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्याचप्रमाणे, देशात परतणाऱ्या नागरिकांना चौदा दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. आपल्या आक्रमक दृष्टीकोनामुळे चीनला हा विषाणू थोपवण्यात यश आले आहे, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे उपाय, मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या चाचण्या आणि बाधित झालेल्या लोकांना वेगळे ठेवल्यामुळे संक्रमण नियंत्रणात आले आहे.
इटली आणि स्पेनसारख्या देशांना परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आणखी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि काँटॅक्ट ट्रेसिंग न करता केवळ सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून विषाणूचा वेग कमी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे, असे प्रतिपादन काऊलिंग यांनी केले आहे. आणि तरीही, चीनमध्ये नव्या उद्रेकांचा धोका मोठा आहे कारण बंधने शिथिल केल्यामुळे विषाणू लोकांमध्ये संक्रमित होऊ शकतो आणि काही संसर्गाचे दीर्घकाळापर्यंत निदान न होण्याचीही शक्यता आहे, असे मत हाँगकाँग विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांवरील संशोधक गॅब्रिअल ल्युँग यांनी केले आहे. कदाचित एक लॉकडाउन पुरेसे ठरणार नाही ही शक्यता आहे आणि विषाणूचे दमन करण्यासाठी पुन्हा एकदा कठोर प्रयत्नांची पुन्हा गरज भासू शकते, असेही ते म्हणाले.
"आरोग्य, अर्थव्यवस्थेचे संरक्षण आणि भावनिक स्वास्थ्य यामधील तणावामुळे प्रत्येक सरकारला नजीकच्या भविष्यात त्रास होणार आहे."
हुबेई प्रांतातील चिनी शहरातील आयुष्य अद्याप पूर्ववत झालेले नाही, मात्र लोक घराबाहेर पडून कामावर पुन्हा रुजू होत आहेत आणि कारखाने पुन्हा सुरू होत आहेत. अधिकृत सरकारी माहितीनुसार, विद्यापीठे, शाळा आणि पाळणाघरे बंद राहणार आहेत. या प्रांताची राजधानी वुहानमध्ये जाण्यायेण्यावर 8 एप्रिलपर्यंत बंधने आहेत. मार्चच्या 18 तारखेनंतर हुबेई प्रांतातील पॉझिटीव्ह प्रकरणांमध्ये तीव्र घसरण झाली आहे.
हुबेई वगळता इतर सर्व प्रांतांमध्ये चीनमधील हालचाल आणि आर्थिक व्यवहारांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या नंतरच्या टप्प्यात वाढ दिसून आली. परंतु कोणतीही पॉझिटिव्ह प्रकरणे आढळून आली नाही. जरी मार्चमध्ये हुबेईमधील व्यवहारांना सुरुवात झाली तरीही नव्या प्रकरणांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. जर समाजातील बहुतांश लोक, म्हणजे 50 ते 70 टक्के लोकांना संसर्ग झाला असेल आणि आता ते सुरक्षित असतील, तर विषाणूसाठी पुन्हा प्रस्थापित होणे असेल, असे ल्युँग म्हणाले.
वुहानमध्ये 81,000 लोकांना संसर्ग झाला होता आणि आता ते लोक रोगापासून सुरक्षित आहेत, असेही ते म्हणाले. परंतु हे प्रमाण 10 टक्क्यांहून कमी आहे, याचाच अर्थ असा, की अजूनही अनेक लोकांना संसर्गाचा धोका आहे. लसींमुळे सुरक्षित लोकांची टक्केवारी वाढेल, परंतु किमान वर्षभरासाठी कोणतीही लस येणे अपेक्षित नाही. "या आकडेवारीमुळे सुटकेचा निः श्वास टाकता येणार नाही", असेही ते पुढे म्हणाले.
विशेष म्हणजे, चीन अजूनही मोठ्या प्रमाणावर कोविड-19वर देखरेख करीत आहे. सर्व प्रांतांमधील नागरिकांना त्यांच्या आरोग्याचा तपशील आणि आतापर्यंत केलेल्या प्रवासाच्या माहिती आधारे एक क्युआर कोड देण्यात आला आहे. हा एक प्रकारचा बारकोड असतो जो स्कॅन केल्यानंतर माहिती मिळते. जर एखाद्या व्यक्तीने चीनमधील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात वास्तव्य केले असेल किंवा विलगीकरण कक्षात राहून चाचणीत निगेटिव्ह आढळून आली असेल, अशा व्यक्तीला 'ग्रीन स्टेटस' दिले जाते. म्हणजेच या व्यक्तीला धोका सर्वात कमी आहे. अशा व्यक्तींना प्रांतिक सीमा पार करता येतात. तसेच रुग्णालये, निवासी भाग इत्यादी ठिकाणी संचार करता येतो.
अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्तीस इतरांमध्ये मिसळण्यापासून रोखता येते. एवढेच नाही, जर एखादे नवीन प्रकरण आढळून आले, तर सरकार या व्यक्तीच्या हालचाली ट्रॅक करु शकते आणि ती व्यक्ती ज्या इतर व्यक्तींच्या संपर्कात आली असण्याची शक्यता आहे, त्यांचे नेमके ठिकाण शोधून काढू शकते. या महामारीचा सामना करणारे इटली, स्पेन आणि अमेरिकेसारखे देश हे सोशल डिस्टन्सिंगची धोरणे आणि लोकांनी घरामध्ये राहण्यासंदर्भातील उपायांवर अवलंबून राहत आहेत.
चीननेदेखील हे उपाय अंमलात आणले. मात्र, याचवेळी देशाने नवी रुग्णालये उभारली आणि मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दारोदारी जाऊन लोकांची चाचणी केली. त्यांनी ताप आलेल्या सगळ्यांची चाचणी केली आणि पॉझिटीव्ह असणाऱ्या व्यक्तींना विलग ठेवले. या अतिरिक्त उपायांमुळे चीनला या विषाणूला थोपवण्यात मदत झाली आहे.
हेही वाचा : कोरोना विषाणूच्या परिस्थितीत सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व..