ETV Bharat / international

चीनची लस घेतल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तान के प्रधानमंत्री इमरान खान कोरोना संक्रमित पाए गए है.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल असिस्टंट फैजल सुल्तान यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान
author img

By

Published : Mar 20, 2021, 5:14 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. पाकमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल असिस्टंट फैजल सुल्तान यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

पंतप्रधान इम्रान खान यांना काही दिवसांपूर्वीची चीनी कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. लस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतलं आहे. तर संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केलं आहे.

इम्रान खान यांनी कोणती लस घेतली?

इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी चीनची कोरोना लस सिनोफार्म टोचून घेतली होती. पाकिस्तानात कोरोना लस निर्मित होत नाही. त्यामुळे चीन लस पाठवली तरच पाकिस्तानात लसीकरण होतं. लवकरच चीनकडून सिनोफार्म लसीची खेप पाकमध्ये पोहचणार आहे. मात्र, पंतप्रधान इम्रान खान यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याने लसीच्या प्रभावीपणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जगातील राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण -

जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिका, यूके, जपान, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन, भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. अनेक देशांच्या प्रमुखांना कोरोनाची बाधा झाली आहे. इंग्लडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू, डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांच्या पत्नी मिलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

हेही वाचा - सरकारने वाढवली बेरोजगारी, महागाई आणि मित्रांची 'कमाई', राहुल गांधींचा केंद्रावर हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.