ETV Bharat / international

करतारपूर कॉरिडॉर : पाकिस्तानकडून सद्भावनेचे मृगजळ तयार करण्याचा प्रयत्न..

पाकिस्तानने महाराजा रणजीत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त 29 जून 2020 रोजी शीख यात्रेकरुंसाठी ऐतिहासिक कॉरिडॉर पुन्हा खुले करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, भारताने करतारपूर कॉरिडॉर पुन्हा खुले करण्यास हिरवा कंदील दाखवण्यास स्पष्ट निरिच्छा दर्शवली आहे. कारण, सध्या दोन्ही देश कोरोना महामारीचा सामना करीत आहेत. याबाबत लिहित आहेत वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा...

author img

By

Published : Jun 29, 2020, 3:07 PM IST

Pak Creating Mirage Of Goodwill - India On Kartarpur Opening Proposal
करतारपूर कॉरिडॉर : पाकिस्तानकडून सद्भावनेचे मृगजळ तयार करण्याचा प्रयत्न..

हैदराबाद : पाकिस्तानने महाराजा रणजीत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त 29 जून 2020 रोजी शीख यात्रेकरुंसाठी ऐतिहासिक कॉरिडॉर पुन्हा खुले करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, भारताने करतारपूर कॉरिडॉर पुन्हा खुले करण्यास हिरवा कंदील दाखवण्यास स्पष्ट निरिच्छा दर्शवली आहे. कारण, सध्या दोन्ही देश कोरोना महामारीचा सामना करीत आहेत.

"जगभरातील प्रार्थनास्थळे खुली होत आहेत. पाकिस्तानदेखील करतारपूर साहिब कॉरिडॉर शीख यात्रेकरुंसाठी खुले करण्याची तयारी करीत आहे. महाराजा रणजीत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त 29 जून 2020 रोजी आम्ही हे कॉरिडॉर खुले करण्यास तयार आहोत, असा संदेश भारताला देऊ इच्छितो", असे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. मात्र, पाकिस्तान केवळ खोट्या सद्भावनेचे प्रदर्शन करीत आहे, असे भारताने म्हटले आहे.

"अवघ्या दोन दिवसांच्या सूचनेवर पाकिस्तान 29 जून रोजी करतारपूर कॉरिडॉर सुरु करण्याचा प्रस्ताव मांडत केवळ सद्भावनेचे मृगजळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, द्विपक्षीय करारात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रवास करण्याच्या सात दिवस अगोदर भारताने पाकिस्तानला माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी भारताला बऱ्यापैकी अगोदर नोंदणी प्रक्रिया सुरु करण्याची गरज आहे", असे मत भारतीय अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

  • As places of worship open up across the world, Pakistan prepares to reopen the Kartarpur Sahib Corridor for all Sikh pilgrims, conveying to the Indian side our readiness to reopen the corridor on 29 June 2020, the occasion of the death anniversary of Maharaja Ranjeet Singh.

    — Shah Mahmood Qureshi (@SMQureshiPTI) June 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 9 नोव्हेंबर 2019 रोजी करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केले होते. हे कॉरिडॉर अखेर बाबा गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला खुले करण्यात आले. भारतातील तसेच जगभरातील शीख यात्रेकरुंची इच्छा यानिमित्ताने पुर्ण झाली होती.

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभुमीवर 16 मार्च रोजी हे कॉरिडॉर तात्पुरते बंद करण्यात आले होते. मात्र, कित्येक महिन्यांच्या लॉकडाऊनंततर जगभरातील काही प्रार्थनास्थळे हळूहळू सुरु करण्यात येत आहेत. "आरोग्यासंबंधी मार्गदर्शक तत्वांचे पालन होत आहे याची खात्री करण्यासाठी, कॉरिडॉर पुन्हा खुले करण्यास आवश्यक एसओपी निश्चित करण्यासाठी पाकिस्तानने भारताला निमंत्रण दिले आहे", असे वक्तव्य पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केले आहे.

मात्र, रुग्णालये आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांवर ताण निर्माण करत भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पाकिस्तानमध्ये कोविड 19 प्रसाराचा मोठ्या प्रमाणावर वेग असून दररोज 150 लोक मृत्यूमुखी पडत आहेत.

"कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून आंतरसीमा प्रवासावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी आणि इतर संबंधित घटकांबरोबर सल्लामसलत करुन पुढील निर्णय घेतला जाईल". अशी माहिती भारत सरकारमधील सुत्रांनी दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी सीडीए सय्यद हैदर शाह अली यास समन्स सुनावले आणि सात दिवसांमध्ये आपली कर्मचारीसंख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश दिल्यानंतर, काही दिवसातच इस्लामाबादकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला. आपणदेखील या प्रस्तावास प्रतिसाद देऊ असे भारताकडून सांगण्यात आले आहे. कारण, एकमेकांच्या देशांमधील संबंधित आयोगांमध्ये नियुक्त राजनैतिक अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचे अपहरण, धमक्या, टेलिंग तसेच त्रास देण्याच्या आरोपांवरुन दोन्ही देशांमधील संबंध बिघडत चालले आहेत.

"याशिवाय, पाकिस्तानने द्विपक्षीय करारात कबूल करुनदेखील त्यांच्या बाजूने रावी नदीच्या पूर प्रदेशात अद्याप पुलाचे बांधकाम केलेले नाही. आता मॉन्सूनच्या पार्श्वभुमीवर यात्रेकरुंना संपूर्ण कॉरिडॉरमधून सुरक्षित पद्धतीने प्रवास करता येईल की नाही, याचा आढावा घेणे गरजेचे आहे", असेही भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सुमारे चार किलोमीटरचे हे ऐतिहासिक कॉरिडॉर करतारपूर साहिब आणि भारतातील गुरदासपूरमधील डेरा बाबा नानक देव यांना जोडते. करतारपूर येथे शीख धर्मगुरु गुरु नानक देव यांनी आयुष्याची 18 वर्षे व्यतित केली होती.

हेही वाचा : 'कराची स्टॉक एक्सचेंज'वर हल्ला; चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.