कराची - पती आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई कॅप्टन मोहम्मद सफदार यांना अटक केल्यानंतर पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरयाम नवाझ यांनी पाकिस्तान सरकारविरोधात टीका केली आहे. पतीला अटक करण्याचा प्रयत्न म्हणजे विरोधी पक्षांची एकी तोडण्याचा प्रयत्न असल्याचे मरयाम नवाझ यांनी म्हटले आहे.
माझे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांचा वापर करून मला ब्लॅकमेल करू नका. हिंमत असेल तर मला अटक करा, असे मरयाम नवाझ यांनी पाकिस्तान सरकारला आव्हान दिले आहे. त्यांचे पती सफदार यांना सोमवारी सकाळी कराचीमधील हॉटेलमधून अटक केली आहे. झोपलेले असताना पोलिसांनी मला ढकलले होते, असा आरोपही त्यांनी केला.
सफदार यांनी पाकिस्तान सरकारविरोधात रविवारी मोठा जाहीर कार्यक्रम घेतला. त्यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. नियमांचा भंग केल्याने मरयाम नवाझ, सफदार आणि इतर २०० जणांविरोधात प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, काही तासानंतर त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. मात्र, या अटकेमागे सिंध सरकार असल्याचे पाकिस्तान सरकारकडून भासविण्यात येत असल्याचे मरयाम यांनी भासविले आहे. सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी फोन करून हे अनेपेक्षित असल्याचे सांगितले आहे.
काहीवेळा मृत्यूची भीतीही दाखविण्यात येते. ही भीती खूप उच्चस्तरावरून दाखविण्यात येते, असा त्यांनी दावा केला. अशा मृत्यूच्या भीतीने आम्ही गप्प बसू असे त्यांना वाटत असेल, अथवा आमची एकी तुटण्याची त्यांना शक्यता वाटत असेल, तर ही त्यांची चूक आहे.