ETV Bharat / international

जपानमध्ये कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू; हुबेई प्रांताबाहेर आत्तापर्यंत ३ बळी - corona virus news

फिलिपाईन्स, हाँगकाँग आणि आता जपानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ४० हजारांच्या पुढे गेली आहे.

corona virus
कोरोना संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 13, 2020, 6:58 PM IST

टोकियो - चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असतानाच जपानमध्येही कोरोना विषाणूमुळे पहिला बळी गेला आहे. त्यामुळे चीनबाहेर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन झाली आहे. कोरोनापासून दिलासा मिळण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाहीत. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत आहे. चीनमध्ये १ हजार जणांचा बळी गेला आहे.

फिलिपाईन्स, हाँगकाँग आणि आता जपानमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ४० हजारांच्या पुढे गेली आहे. डिसेंबरमध्ये चीनमधील हुबेई प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. तसेच २४ देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. चीनमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक देशांनी चीनमधील आपल्या नागरिकांना बाहेर काढले आहे. तसेच चीनमधून येण्यास आणि जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. भारतानेही हुबेई प्रांतात अडकलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढले आहे. मात्र, अजूनही बरेचजण तेथे अडकून पडले आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.

हुबेई प्रांताबाहेर विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून इतर चीनशी या भागाचा संपर्क तोडण्यात आला आहे. त्यामुळे लाखो लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. बस, ट्रेन, विमान सेवा पुर्णतहा: ठप्प झाली आहे. नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू घेणेही मुश्किल झाले आहे. सर्व शहरे सुमसाम झाली आहे. आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून काही प्रमाणात यश येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाला आरोग्य आणीबाणी हाताळताना अडचणी येत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचेही प्रशासनाने मान्य केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.