ETV Bharat / international

कोरोना विषाणूचे थैमान : 1 हजार 523 जणांचा मृत्यू तर 66 हजार लोकांना विषाणूची लागण - कोरोना विषाणूमुळे इतका मृत्यू

चीनमध्ये कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांचा आकडा वेगाने वाढ होत मृताचा आकडा 1 हजार 523 वर पोहोचला आहे.

कोरोना विषाणूचे थैमान
कोरोना विषाणूचे थैमान
author img

By

Published : Feb 15, 2020, 11:27 AM IST

बिजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वेगाने वाढ होत मृताचा आकडा 1 हजार 523 वर पोहोचला आहे. संसर्ग झालेल्या नागरिकांचा संख्या 66 हजार झाली आहे. विषाणूचा सर्वांत जास्त फटका हुबेई प्रांताला बसला आहे.

डिसेंबरमध्ये चीनमधील हुबेई प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. तसेच २६ देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. चीनमध्ये हजारो नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक देशांनी चीनमधील आपल्या नागरिकांना बाहेर काढले आहे. तसेच चीनमधून येण्यास आणि जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.

हुबेई प्रांताबाहेर विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून इतर चीनशी या भागाचा संपर्क तोडण्यात आला आहे. त्यामुळे लाखो लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. बस, ट्रेन, विमान सेवा पुर्णतहा: ठप्प झाली आहे. नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू घेणेही मुश्किल झाले आहे. सर्व शहरे सुमसाम झाली आहे. आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून काही प्रमाणात यश येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाला आरोग्य आणीबाणी हाताळताना अडचणी येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.