ETV Bharat / international

येमेन : नवनिर्वाचित मंत्रिमंडळाला घेऊन उतरत असलेल्या विमानाचा भीषण स्फोट - विमानाचा भीषण स्फोट येमेन

सोशल मीडियावर घटनास्थळावरील शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये विमानतळ इमारतीच्या सभोवताली मोडतोड आणि तुटलेल्या काचांचा खच पडल्याचे दिसत आहेत. घटनास्थळी किमान दोन मृतदेह पडले असल्याचे दिसत असून त्यातील एक संपूर्ण जळाला होता.

साना
साना
author img

By

Published : Dec 30, 2020, 7:25 PM IST

Updated : Dec 30, 2020, 7:41 PM IST

साना - येमेनच्या दक्षिणेकडील शहर अदन येथील विमानतळावर नव्याने तयार झालेल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना घेऊन एक विमान उतरत असताना प्रचंड स्फोट झाला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अद्याप स्फोटाबद्दल काहीही अधिकृत स्पष्ट झालेले नाही. सरकारी प्रतिनिधीमंडळातील कोणाचा मृत्यू झाल्याची अद्याप माहिती नाही. मात्र, स्फोटोनंतर घटनास्थळी मृतदेह पडल्याचे दिसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून जवळपास पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

माध्यमांशी बोलताना एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. घटनास्थळावरून सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये विमानतळ इमारतीच्या सभोवताली मोडतोड आणि तुटलेला काचा दिसल्या आहेत. घटनास्थळी किमान दोन मृतदेह पडले असल्याचे दिसत असून त्यातील एक जळाला होता.

गेल्या आठवड्यात शपथविधी

दुसर्‍या फोटोमध्ये एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीस सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते, त्याचे कपडेही फाटले होते. विरोधी दक्षिणी अलगाववादियांशी झालेल्या समझोता बैठकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल झाले. गेल्या आठवड्यात शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान मईन अब्दुल मलिक सईद यांच्या नेतृत्त्वात मंत्रीवर्ग अदनला परत येत होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली.

देशात कित्येक वर्षांपासून गृहकलह

गेल्या आठवड्यात प्रतिस्पर्धी दक्षिणेक अलगाववाद्यांशी झालेल्या कराराच्या आणि शपथविधीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर पंतप्रधान म्यान अब्दुल मलिक सईद यांच्या नेतृत्वात अदन परत जात होते. देशात कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या गृह युद्धादरम्यान यमनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त सरकार सौदी अरेबियाची राजधानी रियादहून स्व-निर्वासित स्थितीत काम करीत होते.

Last Updated : Dec 30, 2020, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.