ETV Bharat / international

बांगलादेशकडून रोहिंगे मुस्लिमांना निर्जन बेटांवर पाठविण्यास सुरुवात - अराकन प्रांत रोहिंगे

बांगलादेशने रोहिंग्यांना गटागटाने निर्जन बेटांवर धाडण्यास सुरुवात केली आहे. यावर मानवाधिकार संघनटनांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, तरीही सरकारने निर्वासितांना बेटावर धाडण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे.

रोहिंग्या निर्वासित
रोहिंग्या निर्वासित
author img

By

Published : Dec 4, 2020, 4:03 PM IST

Updated : Dec 4, 2020, 5:07 PM IST

ढाका - बांगलादेश आणि मान्यमार देशातील रोहिंगे मुस्लिमांचा प्रश्न मागील काही दशकांपासून तसाच आहे. अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही. रोहिंगे मुस्लिम बांगलादेशचे नागरिक नसल्याचा पवित्रा तेथील सरकारने कायमच घेतला आहे. त्यामुळे त्यांची फरपट सुरू आहे. आता बांगलादेशने रोहिंग्यांना गटागटाने निर्जन बेटांवर धाडण्यास सुरुवात केली आहे. यावर मानवाधिकार संघनटनांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, तरीही सरकारने निर्वासितांना बेटावर धाडण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे.

रोहिंग्या निर्वासित

निर्जन बेटावर केली राहण्याची सोय

बांगलादेशाच्या मुख्य भूमीपासून ३४ किलोमीटर अंतरावर समुद्रात हे बेट आहे. मुसळधार पावसाने हे बेट कायम पाण्याखाली बुडालेले असे. मात्र, मागील २० वर्षात हे बेट उघडे पडले आहे. त्यामुळे सरकारने तेथे काही पायाभूत सुविधा उभ्या केल्या असून रोहिंग्यांना तेथे धाडण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशच्या नौदलाने ११ कोटी डॉलरपेक्षा जास्त रक्कम खर्च करून ह्या बेटांवर घरे, रुग्णालये, मशीद आणि पूर प्रतिबंधक बांध बांधले आहेत.

संयुक्त राष्ट्रानेही व्यक्त केली चिंता

रोहिंगे निर्वासितांच्या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रानेही चिंता व्यक्त केली आहे. विस्थापित होण्याआधी त्यांना स्वतंत्रपणे आणि योग्य ती माहिती घेवून निर्णय घेण्याचा अधिकार असावा, असे म्हटले आहे. सुमारे १ लाख नागरिकांची राहण्याची सोय या बेटांवर करण्यात आलेली आहे. म्यानमारमधील हिंसाचारापासून बचाव करण्यासाठी लाखो नागरिक बांगलादेशात पळून आले असून ते निर्वासित छावण्यांमध्ये अपुऱ्या सुविधांसह राहत आहेत.

कोण आहे रोहिंगे मुस्लिम ?

रोहिंगे जमातीचे नागरिक मान्यमारच्या अराकन प्रांतात राखीन भागात मोठ्या प्रमाणात आहेत. भारतीय उपखंडावर ब्रिटीशांचे राज्य असताना बांगलादेश आणि शेजारील प्रांतातील नागरिक शेतमजूर म्हणून म्यानमारमधील सुपीक अशा राखीन प्रांतात स्थलांतरीत झाले. या ठिकाणी चहाचे मळे आणि मसाल्यांची शेती करण्यासाठी या मजूरांची मोठी मागणी असे. मात्र, पुढे ब्रिटीशांची सत्ता गेल्यानंतर म्यानमार स्वतंत्र झाले. रोहिंगे मात्र तेथेच राहिले. अनेक वर्ष काम केल्याने या स्थलांतरितांनी तेथेच घर बसवले होते. पुढे जाऊन म्यानमारने त्यांना नागरिक म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. बांगलादेशनेही त्यांना माघारी घेण्यास नकार दिला.

अशा काळात रोहिंग्या नागरिकांना दोन्हीही देशांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचे हाल वाढले. अराकन प्रांतातील राखीन भागात हे रोहिंगे दाटीवाटीने राहू लागले. त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नसे. स्थानिक आणि रोहिंगे नागरिकांत आत्तापर्यंत अनेक वेळा हिंसाचार घडला असून यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारमध्ये सुमारे १० लाख रोहिंगे लोकसंख्या आहे. मानवी हक्क संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमच त्यांची बाजू घेतली आहे. मात्र, अद्याप या प्रश्वावर तोडगा निघाला नाही. बांगलादेशातून काही रोहिंगे भारतातही आले आहेत.

Last Updated : Dec 4, 2020, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.