इस्लामाबाद - गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये भूस्खलन होऊन दरड कोसळल्यामुळे एक प्रवासी बस दरीत पडली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तानमध्ये भीषण स्फोट; १२ ठार, १००हून अधिक जखमी
ही बस रावळपिंडीहून स्कार्दूच्या दिशेने जात होती. तेव्हा भूस्खलन होऊन बसवर दरड कोसळली. या अपघातात बस एका खोल दरीत फेकली गेली. राउंडो परिसरात हा अपघात झाला. यात तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे.
या भागात भूस्खलन होणे ही वारंवार घडणारी घटना आहे. हा परिसर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी तसेच येथील धोकादायक रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे.
हेही वाचा - मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 'भीती'च्या अस्त्राचा वापर