जकार्ता - इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि आसपासच्या भागात आलेल्या पुरातील मृतांचा आकडा 43 वर गेला आहे. या पुरामुळे हजारो लोकांचे स्थलांतर करावे लागले. अजूनही शहरांमध्ये सर्वत्र पुराचे पाणी भरलेले असून बचावकार्य वेगात सुरू आहे. मागील सात वर्षांतील ही सर्वांत मोठी पूर परिस्थिती आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला जकार्ता आणि वेस्ट जावा हिल्स भागांमध्ये तब्बल ३७ सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे सिलिवुंग आणि सिसाडेन या नद्यांना पूर आला.
हेही वाचा - सीरियात मागील ३ आठवड्यांत १ लाख ४० हजार बालके विस्थापित
विस्थापित केलेल्या लोकांना सरकारी कार्यालये आणि शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. लोकांना जेवण, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. पुरामुळे पूर्व जकार्तातील हालीम विमानतळ हे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे विमानतळावर साधारणपणे १९ हजार प्रवासी अडकून पडले आहेत.