ETV Bharat / international

चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेची नवी शक्कल; विकसनशील देशांना आर्थिक मदत

author img

By

Published : Oct 19, 2020, 2:45 PM IST

चीनमध्ये मोबाईल आणि मोबाईल बनवण्यासाठी लागणारे सुटे भाग हे स्वस्तात मिळतात. त्यामुळे विकसनशील देश यासाठी चीनला प्राधान्य देतात. विकसनशील देशांनी चीनऐवजी इतर देशांमधून मोबाईल आणि तत्सम साहित्य घ्यावे, यासाठी अमेरिका कित्येक देशांना कोट्यवधी डॉलर्सचे कर्ज देण्यास तयार आहे...

US to offer loans to lure developing countries to shun Chinese telecom gear
चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेची नवी शक्कल; विकसनशील देशांना करतंय आर्थिक मदत

वॉशिंग्टन : आंततराष्ट्रीय स्तरावर चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिका सरकार नवनवीन शक्कल लढवत आहे. आता विकसनशील देशांनी चिनी बनावटीचे मोबाईल फोन वापरू नयेत यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. यासाठी या देशांना आर्थिक मदत देण्याची तयारीही अमेरिका सरकारने दाखवली आहे.

चीनमध्ये मोबाईल आणि मोबाईल बनवण्यासाठी लागणारे सुटे भाग हे स्वस्तात मिळतात. त्यामुळे विकसनशील देश यासाठी चीनला प्राधान्य देतात. विकसनशील देशांनी चीनऐवजी इतर देशांमधून मोबाईल आणि तत्सम साहित्य घ्यावे यासाठी अमेरिका कित्येक देशांना कोट्यवधी डॉलर्सचे कर्ज देण्यास तयार आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जनरल या वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली.

राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत शीतयुद्ध..

गेल्या दोन वर्षांपासून अमेरिका चीनमधील हुवेई आणि झेडटीई या कंपन्यांना विरोध करत आहे. यासाठी ते राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत आहे. हुवेई कंपनीवर हेरगिरी केल्याचा आरोप करत यापूर्वीच तिला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. आता इतर देशांनीही याचप्रकारे कारवाई करत चीनी कंपन्यांना नकार द्यावा, यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे.

हेही वाचा : कमला हॅरिस यांच्या निकटवर्तीयाला कोरोनाची लागण; त्यांचा अहवाल आला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.