ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष - जो बायडेन

अमेरिकेतील फ्लोरीडाच्या मार-ए-लागोमध्ये आकाशात प्लेनद्वारे एक ब‌ॅनर झळकवण्यात आलं. त्या ब‌ॅनरवर 'डोनाल्ड ट्रम्प हे आतापर्यंतचे सर्वांत खराब राष्ट्रध्यक्ष ' अस लिहलेलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Jan 25, 2021, 4:43 PM IST

वॉशिंग्टन डी.सी. - अमेरिकेत सत्तापालट झाला असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत बाजी मारली. ट्रम्प यांचा पराभव झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. फ्लोरीडा राज्यातील मियामीमध्ये एक ब‍ॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'डोनाल्ड ट्रम्प हे आतापर्यंतचे सर्वांत खराब राष्ट्रध्यक्ष होते', असं या ब‌ॅनरवर लिहलं होतं.

मार-ए-लागोमध्ये आकाशात प्लेनद्वारे एक ब‌ॅनर झळकवण्यात आलं. त्या ब‌ॅनरवर 'डोनाल्ड ट्रम्प हे आतापर्यंतचे सर्वांत खराब राष्ट्रध्यक्ष ' अस लिहलेलं होतं. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर मार-ए-लागोमध्येच डोनाल्ड ट्रम्प सध्या राहत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ते ब‌ॅनर पाहावं, या उद्देशाने ते ब‌ॅनर आकाशात झळकावलं गेल असल्याचं बोललं जात आहे.

जो बायडेन यांच्या शपथविधीच्या काही तासांनंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी समाधान व्यक्त केले होतं. ट्रम्प प्रशासन देवाच्या कृपेने गेल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतल्याने त्यांच्याविरोधातर असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

ऐतिहासिक निवडणूक -

२०२० ची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक समजली जात होती. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर जागतिक समीकरणे बदलली आहेत. जगात चीनचा प्रभाव वाढत असतानाच कोरोनाचा प्रसार झाला. तसेच महामारीमुळे सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेत झाले. अर्थव्यवस्थाही रसातळाला गेली. अशा परिस्थितीत अमेरिकेची सत्ता कोणाच्या हातात जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. यात बायडेन यांनी बाजी मारली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.