वॉशिंग्टन : अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सोमवारपासून पुन्हा करणार प्रचार..
निकटवर्तीय अधिकाऱ्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच, कमला यांनी खबरदारी म्हणून आपले सर्व प्रचारदौरे थांबवले होते. यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पतीने आपली कोरोना चाचणी केली होती. ती निगेटिव्ह आल्यामुळे आता सोमवारपासून त्या पुन्हा प्रचाराला लागणार आहेत.
शुभचिंतक डोनाल्ड ट्रम्प..
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. "मला आशा आहे की त्यांची तब्येत ठीक असावी, कारण त्यांच्यासोबत असणाऱ्या बऱ्याच लोकांना कोविड-१९ची लागण झाली आहे. आपण सर्व त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देऊया." असे ते मस्केगॉनमधील आपल्या प्रचारसभेत म्हणाले.
हेही वाचा : कोरोनाला दिलेल्या लढ्यामुळेच मिळाला ऐतिहासिक विजय - जॅसिंडा अर्डर्न