वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी बहीण आणि माजी न्यायाधीश मॅरीन ट्रम्प बॅरी यांच्यामधील एक ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आले आहे. त्यामध्ये मॅरीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना 'क्रूर आणि कोणतीच तत्त्वे नसलेला व्यक्ती' म्हटले आहे. मॅरिन ट्रम्प बॅरी यांचे बोलणे त्यांच्या माहितीशिवाय भाची मेरी ट्रम्पने रेकॉर्ड केले होते.
मेरी ट्रम्प यांचे नुकतेच 'टू मच अँण्ड नेव्हर इनफ : हाऊ माय फॅमेली क्रिएटेड द वल्डर्स मोस्ट डेंजेर मॅन' हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यांच्या पुस्तकात रेकॉर्डिंगचा उल्लेख नसल्याने, याबाबत काही प्रश्नही उपस्थितीत केले जात आहेत. दरम्यान, मॅरीन ट्रम्प बॅरी यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग हे 2018 आणि 2019 मधील असल्याचे मेरी ट्रम्पने सांगितले.
रेकॉर्डिंगमध्ये काय म्हणाल्या मॅरीन -
83 वर्षीय मॅरीन यांनी त्यांच्या भावाला (डोनाल्ड ट्रम्प) एका न्यूज चॅनलला मुलखात देताना ऐकले होते. त्यात ट्रम्प म्हणाले होते की, ते मॅरीन यांना आई-वडिलांपासून ताटातूट झालेल्या अप्रवासी मुलांच्या सुनावणीसाठी सीमेवर तैनात करणार आहेत. त्यावर मॅरिन म्हणाल्या की, जर तुम्ही एक धार्मिक व्यक्ती असता आणि तुम्हाला खरंच लोकांची मदत करण्याची इच्छा असते. तेव्हा तुम्ही असे बोलू शकत नाही. आपल्या भाचीशी बोलताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना क्रूर आणि कोणतीच तत्त्वे नसलेला व्यक्ती संबोधले. संबधित रेकॉर्डिंग ही ट्रम्प यांचे दिवंगत बंधू रॉबर्ट ट्रम्प यांच्या श्रद्धांजली सभेनंतर समोर आली आहे.