ETV Bharat / international

एच-1 बी व्हिसा निर्बंधामध्ये शिथिलता; 'या' लोकांना मिळणार अमेरिकेत प्रवेश - अमेरिका व्हिसा बंदी

परदेशी नागरिकांना अमेरिकेत काम करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या एच-1 बी व्हिसा 2020 च्या उर्वरीत काळासाठी रद्द करण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर ट्रम्प प्रशासनाने व्हिसामधील काही नियम शिथिल केले आहेत.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Aug 13, 2020, 7:36 AM IST

वॉशिंग्टन डी. सी. - परदेशी नागरिकांना अमेरिकेत काम करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या एच-1 बी व्हिसा 2020 च्या उर्वरीत काळासाठी रद्द करण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर ट्रम्प प्रशासनाने व्हिसामधील काही नियम शिथिल केले आहेत. जे व्हिसाधारक व्हिसा बंदीच्या घोषणेपूर्वी जी नोकरी करत होते. त्याच नोकरीत परत येत असतील, तर त्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

तज्ज्ञ, ज्येष्ठ-स्तरीय व्यवस्थापक आणि इतर कामगार ज्यांच्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, अशा व्यक्तींनाच प्रवास करण्यात परवानगी मिळेल. प्राथमिक व्हिसाधारकांसह त्यांच्या पत्नी आणि मुलांनाही प्रवेश दिला जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या सल्लागारांनी सांगतिले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एच-१बी व्हिसा वर्षभरासाठी रद्द करण्याची घोषणा केली होती. अमेरिकेतील लोकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले होते. यापुढे एच-१बी व्हिसा हवा असणाऱ्या लोकांना 2020 संपेपर्यंत वाट पाहावी लागणार होती. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने शिथिलता दिल्याने जे अमेरिकेत पूर्वीपासून नोकरी करत आहेत, त्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, यूएस चेंबर ऑफ कॉमर्स तसेच व्यापार गटांच्या संघाने ट्रम्प प्रशासनाच्या व्हिसा निर्बंधावरील निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. याचिकेचा अ‌ॅपल, फेसबुक, अ‌ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि टि्वटरने पाठिंबा दर्शवला होता. अमेरिकन कामगारांना संरक्षित करण्यासाठी ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय हा त्याच कामगारांसाठी, कंपनी मालकांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी नुकसानकारक आहे, असे अ‌ॅपल, फेसबुक, अ‌ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि टि्वटरने निवेदनात म्हटलं होतं.

एच-१बी व्हिसा म्हणजे काय?

एच-१बी व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे, ज्याद्वारे अमेरिकेतील कंपन्या बाहेरच्या देशांमधील एखाद्या विषयातील तज्ज्ञांना कामावर ठेवण्याची मुभा मिळते. या प्रकारच्या व्हिसाची सुरुवात १९९०मध्ये करण्यात आली. अमेरिकेतील कंपन्यांमध्ये संशोधन, अभियांत्रिकी आणि कम्प्युटर प्रोग्रामिंगसाठी तंत्रज्ञाची आणि तज्ज्ञ कामगारवर्गाची भासणारी कमतरता पाहता, परदेशातील व्यक्तींना कामावर रुजू करण्याच्या उद्देशाने हे सुरू करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.